Prajakta Mali New Farm House Saam TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali New Farm House : प्राजक्ता माळीचं स्वप्न पूर्ण; निसर्गाच्या सानिध्यातील फार्म हाऊसची झलक एकदा पाहाच

Prajakta Mali Share Post : प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे स्वप्न साकार झाल्याचे सांगितलं आहे.

Pooja Dange

Prajakta Mali Achieved Her Dream Buy Farm House : अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्राजक्ता अभिनयासह नृत्यात देखील पारंगत आहे. सूत्रसंचानाची भूमिका देखील तिने उत्तम निभावते. प्राजक्ताने तिच्या जीवनात अनेक नवनवीन गोष्टी यशस्वीरीत्या केल्या आहेत. असाच प्राजक्ताने एक नवी उडी घेतली आहे. तिने तिचे स्वःताचे फार्म हाऊस घेतले आहे.

प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे स्वप्न साकार झाल्याचे सांगितलं आहे. प्राजक्ताने कर्जतमध्ये एक मोठं फार्म हाऊस घेतल आहे. प्राजक्ताने इन्स्टावरून ही माहिती दिली आहे. निसर्गाच्या कुशीत घर घेण्याचं आपलं स्वप्न होतं असं प्राजक्ताने या पोस्टमध्ये म्हटल आहे. प्राजक्ताने या घराला प्राजक्तकुंज असं नाव दिलं आहे. (Latest Entertainment News)

प्राजक्ताच्या कुटुंबीयांच प्राजक्तप्रभा, प्राजक्तराज नावाने दोन प्रॉपर्टी आहेत. आता प्राजक्तकुंजमुळे ही त्रयी पूर्ण झाल्याचं प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटल आहे. आपल्या खानदानातील सर्वात सुंदर प्रॉपर्टी आणि खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत..फेडू.. असे म्हणत प्राजक्ताने चाहत्यांचे आशिवार्दही मागितले आहेत.

काय आहे प्राजक्ता माळीची पोस्ट ?

प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'स्वप्न साकार. स्वप्नातील घराची मालकीण झाले त्यामुळे खूप आनंद आहे. डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं.

नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”. (१- प्राजक्तप्रभा २- प्राजक्तराज ३- प्राजक्तकुंज प्राजक्तत्रयी पुर्ण.) खानदानातली सर्वात सुंदर property, खानदानातल्या सर्वात मोठ्या कर्जासहीत... फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या. #हक्काचंघर #प्राजक्तकुंज #गुरुकृपा'

प्राजक्ता अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक आहेच त्यासह ती कविता देखील करते. तिने प्राजक्तराज नावाचा ज्वेलरीचा व्यवसाय देखील सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT