Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : हास्यजत्रेच्या सेटवर रंगला अनोखा खेळ; 'फुलवंती'नं दिलं 'पखवाज-घुंगरू'चॅलेंज, कोणी मारली बाजी?

Prajakta Mali Funny Game Video : प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांसोबत हास्यजत्रेच्या सेटवर धमाल खेळ खेळला आहे. या खेळात नक्की कोण जिंकले, जाणून घ्या .

Shreya Maskar

प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सध्या सर्वत्र गाजत आहे. प्राजक्ता 'फुलवंती' या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. प्राजक्ता (Prajakta Mali) आणि गश्मीर महाजनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) या कार्यक्रमाचे कलाकारही पाहायला मिळत आहे. या कलाकारांनी चित्रपटासाठी एकही रुपया मानधन घेतले नाही. प्राजक्ताच्या नृत्याचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या कार्यक्रमाच्या सेटवर प्राजक्ता माळीने अभिनेत्री स्नेहल तरडे आणि अभिनेता ऋषिकेश जोशी यांना एक मजेशीर चॅलेंज दिले आहे. याचा व्हिडिओ प्राजक्ताने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'फुलवंती' चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेत्री स्नेहल तरडे हिने केले आहे.

प्राजक्ताने 'फुलवंती'च्या टीमला एक खास चॅलेंज देऊन एक मजेशीर गेम खेळला आहे. तिने स्नेहल तरडे आणि ऋषिकेश जोशी यांना 'पखवाज आणि घुंगरू' हे चॅलेंज दिल आहे. आपण तळ्यात मळ्यात खेळतो तसाच हा गेम आहे. प्राजक्ताच्या म्हणण्यानुसार त्यांना इकडून तिकडे उड्या माराव्या लागतात. जो नाव घेतल्यावर चुकीच्या दिशेने उडी मारेल तो हरला असे घोषित होते. हा खेळ अनेक वेळ चाला तरी स्नेहल किंवा ऋषिकेश पैकी कोणही बाद झाले नाहीत. त्यांना बाद करण्यासाठी प्राजक्ताने अनेक युक्त्या केल्या मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी प्राजक्तानेच हार मानली आणि म्हणाली की, स्नेहल-हृषिकेशने अत्यंत हुशारीने हा गेम खेळला आहे आणि न हारता बाजी मारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काही मागण्या राजकीय फायद्यासाठी असतात, मनोज जरांगे पाटलांनी गणेशोत्सवाचा विचार करावा- सामंत

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT