Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : आधी नकार, मग स्टार अँकर, प्राजक्ता माळीला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो कसा मिळाला?

Maharashtrachi Hasya Jatra : 'फुलवंती' म्हणजेच आपली लाडकी प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोसोबत कशी जोडली गेली याचा तिने किस्सा सांगितला आहे.

Shreya Maskar

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. हा विनोदी शो आहे. यातील प्रत्येक कलाकाराची आज वेगळी ओळख तयार झाली आहे. कलाकारांसोबत या शोची होस्ट प्राजक्ता माळींने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तिच्या होस्टिंगच्या स्टाइलने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे.

प्राजक्ताने (Prajakta Mali) एका मुलाखतीत ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोसोबत कशी जोडली गेली याचा खुलासा केला आहे. तिने मुलाखतीत सांगितले की, "झी मराठीवर मी आधी 'गुड मॉर्निंग महाराष्ट्र' हा शो होस्ट करायचे, त्यानंतर मी काहीच होस्टिंग केलं नाही. तेव्हा मला हास्यजत्रेच्या (Maharashtrachi Hasya Jatra) मेकर्सने होस्टिंगसाठी कॉल केला आणि मी थेट त्यांना नकार दिला. कारण माझा कॉमेडीशी काही संबंध नाही." ती पुढे म्हणाली की, मी पंच पाडेन, मला सेन्स ऑफ ह्युमरचा गंध नाही. मला हे जमणार नाही." पुन्हा दोन दिवसांनी त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की, "आम्हाला तूच हवी आहेस, आम्ही तुझं पेमेंट वाढवतोय तू कर"

हास्यजत्रेच्या ऑफरवर प्राजक्ताने मित्राशी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला की, "तू काही नाही म्हणते? पैसै तर चांगले देत आहेत." यावर मी म्हणले की, "मला जमणार नाही" त्यावर तिचा मित्र म्हणाला "तु न केल्याशिवाय हे कसं बोलतेस, एक शेड्युल करून बघ आणि मग ठरव. नाही जमलं तर नंतर नको करू." असा किस्सा प्राजक्ताने सांगितला. मित्राचा हा मुद्दा प्राजक्ताला पटला आणि तिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोला होकार दिला. "शो चे पहिले दिवस थोडे कठीण होते. मात्र आता मला तुला हसताना बघून आम्हाला छान वाटतं अशा प्रतिक्रिया येतात" असे प्राजक्ता माळी म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: कामाची बातमी! आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती होणार? तुमचा पगार किती वाढणार? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Mars transit astrology: 18 महिन्यांनी मंगळ बनवणार खास योग; 'या' राशींवर शनीदेवाची राहणार कृपा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

SCROLL FOR NEXT