Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं मुंबईत खरेदी केलं कोट्यवधींचे घर; २८ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट, किंमत वाचून व्हाल अवाक्

Prajakta Mali Buys Luxury Flat : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत आलिशान घर घेतले आहे. किती कोटींमध्ये डील झाली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्राजक्ता माळीने मुंबईत खरेदी केले आलिशान घर

कोटींमध्ये झाली डील

28 व्या मजल्यावर आहे प्राजक्ताचा आलिशान फ्लॅट

कायम आपल्या कामामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने यशाचे उंच शिखर गाठले आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्रीने प्राजक्ता माळीने आता स्वतःचे नवीन हक्काचे घर घेतले आहे.

businessstandardच्या वृत्तानुसार, मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांप्रमाणे, प्राजक्ता माळीने मुंबईत आलिशान घर खरेदी केले आहे. गोरेगाव पूर्व येथील हाय-प्रोफाइल 'ओबेरॉय एक्सक्युझिट' मध्ये तिने फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट २८ व्या मजल्यावर असून तिने ३२.१२ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. CRE मॅट्रिक्सने ऍक्सेस केलेल्या मालमत्ता नोंदणी दस्तऐवजानुसार, प्राजक्ता माळीने हे लग्जरी घर ६.४२ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. अपार्टमेंटचा कार्पेट एरिया सुमारे ९९६ चौरस फूट असून २४० चौरस फुटांची एक टँडम कार-पार्किंग जागा आहे.

१२ ऑगस्ट २०२६ रोजी या फ्लॅटच्या व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे. प्राजक्ताने ही मालमत्ता नूर खान आणि युसूफ अली खान यांच्याकडून खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीने यासाठी ३०,००० रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. या आलिशान फ्लॅटसाठी प्राजक्ता माळीने होम लोन घेतले आहे. २८ जुलै २०२६ रोजी प्राजक्ताचे इंडियन बँकेकडून ५.७८ कोटी रुपयांचे होम लोन मंजूर झाले होते.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची होस्ट म्हणून प्राजक्ता माळीला खूप लोकप्रियता मिळाली. फुलवंती' या चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.प्राजक्ता माळी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ती एक उत्तम अभिनेत्री, निर्माती, व्यवसायिका, कवियत्री आहे. तिचा 'फुलवंती' चित्रपट जगभरात खूप गाजला. प्राजक्ता माळीचे कर्जतला आलिशान फार्महाऊस आहे. या फार्महाऊसचे नाव 'प्राजक्त कुंज' असे आहे. प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच एक व्यावसायिका आहे. तिचा 'प्राजक्तराज' नावाचा पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडून आले अन् त्यांनाच विसरले? – सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांचा घणाघात!

Kalyan Crime: भावाचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; चार ते पाच जणांकडून धारदार शस्त्राने वार

Maharashtra News Live Update: नवापुरमध्ये 93 कोटीच्या पाणीपुरवठा योजने विरोधात शेतकरी आक्रमक...

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

SCROLL FOR NEXT