Prabhas Facebook Account Hacked Saam TV
मनोरंजन बातम्या

Prabhas Facebook Account Hacked : सुपरस्टार प्रभासचे फेसबुक अकॉउंट हॅक ; विचित्र पोस्टमुळे चाहत्यांसह नेटकऱ्यांनाही झटका

Prabhas Post : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे.

Pooja Dange

Prabhas Share Post About Hacked Account : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. हॅकरने त्याचे अधिकृत फेसबुक हॅक केल्यानंतर काही विचित्र पोस्टही शेअर केल्या आहेत. हे प्रकरण इतके वाढले की काही स्वत: प्रभासला याबद्दल अधिकृत पोस्ट शेअर करावी लागली आहे.

प्रभासने सांगितले की, त्याच्या फेसबुक अकाउंटशी कोणीतरी छेडछाड केली आहे. त्यानंतर लगेच प्रभासच्या चाहत्यांनीही कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.

प्रभासचे फेसबुक अकाउंट गुरुवारी 27 जुलैला रात्री हॅक झाले होते. त्यानंतर हॅकरने दोन व्हिडिओही शेअर केल्या. जिथे हॅकरने लिहिले, Unlucky people. या पोस्टमध्ये एक गमतीशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये, हॅकरने प्रभासच्या फेसबुक अकाऊंटवर एका व्यक्तीचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Latest Entertainment News)

हॅकरच्या या पोस्टनंतर ट्रोलर्सनीही खूप कमेंट करायला सुरुवात केली. ट्रोल आर्मीला प्रभासच्या बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली. 'आदिपुरुष' ते 'राधे श्याम'सारखे प्रभासचे मोठे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. 'आदिपुरुष'मुळे प्रभास आणि त्याची टीम याआधीच खूप वादात सापडली होती.

Prabhas Facebook Account Hacked

त्याचवेळी प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली, 'सर्वांना नमस्कार. माझ्या फेसबुक पेजशी छेडछाड केली गेली आहे. या प्रकरणाचा शोध घेण्याचा माझी टीम प्रयत्न करत आहे.

प्रभासच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर तो लवकरच 'प्रोजेक्ट के' म्हणजेच 'कल्की 2898' मध्ये अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हसनसोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT