Popular reel star Arun Tupe has passed away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Reel Star Death: प्रसिद्ध मराठमोळ्या रिलस्टारचं निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

Arun Tupe Death: छत्रपती संभाजीनगरमधील लोकप्रिय रील स्टार अरुण तुपे याचे निधन झाले आहे. राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर चाहते शोक व्यक्त करत आहेत.

Shruti Vilas Kadam

Arun Tupe Death: सोशल मीडिया जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लोकप्रिय रील स्टार अरुण तुपे याचे अचानक निधन झाले आहे. मंगळवारी (१० मार्च) सकाळी तो त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण तुपे हे छत्रपती संभाजीनगरमधील बालाजी नगर परिसरात राहत होते. सकाळच्या सुमारास तो घरात मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

अरुण तुपे हा सोशल मीडियावर त्याच्या वेगळ्या विनोदी रील्समुळे लोकप्रिय झाले होते. इंस्टाग्रामवर “कोण अरुण तुपे?” या नावाने त्याचे अकाऊंट होते आणि त्याचे इंस्टाग्रामवर सुमारे १.७९ लाख फॉलोअर्स होते. त्याच्या रील्सना लाखो व्ह्यूज मिळत असत. त्यामुळे तरुणांमध्ये त्याची मोठी लोकप्रियता होती.

दरम्यान, त्यांच्या निधनापूर्वी काही तासांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर शेवटचा रील पोस्ट केली होती. त्या व्हिडिओवर तो चाहत्यांच्या कमेंट्सना उत्तरही देत होता. त्यामुळे अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

काही वृत्तांनुसार, अरुण तुपे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

Shocking : धक्कादायक! ९ महिन्याचं बाळ धावत्या एक्सप्रेसच्या खिडकीतून पडले, नंतर जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला

"मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं ते करा" असं म्हणणाऱ्या फ्लॅटधारकांना झटका; सोसायटी करू शकते 'ही' कडक कायदेशीर कारवाई

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT