Poonam Pandey gets Trolled For obscene gestures while buying mangoes Instagram/@instantbollywood
मनोरंजन बातम्या

Video : पूनम पांडेचे आंब्यांसोबत फोटोशूट; अश्लील हावभावामुळे नेटीझन्सकडून ट्रोल

Poonam Pandey Photoshoot With Mangoes Viral Video : तिने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याबद्दल नेटिझन्स तिला ट्रोल (Trolled) करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सध्या उन्हाळा सुरु आहे. आंबे दिसले की, प्रत्येकाला आंबे खाण्याचा मोह होतोच. याला सेलिब्रिटीजही अपवाद नाही. अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिलासुद्धा आंबे (Mango) खाण्याचा मोह झाला. मग काय, ती मुंबईतल्या एका फळबाजारात अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे गेली. यावेळी एका आंबे विक्रेत्याच्या स्टॉलकडे जाऊन तिने आंबे घेतले. तिला पॅपराझी (Paparazzi) फॉलो करत होते. त्यामुळे त्यांनी तिचे फोटो काढायला सुरुवात केली. तिनेही आंबे हातात घेत पोज दिल्या. यावेळी तिच्या चित्र-विचित्र वर्तनाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. (Poonam Pandey gets Trolled For obscene gestures while buying mangoes)

हे देखील पाहा -

अश्लील हावभावांमुळे नेटीझन्सकडून ट्रोल

पूनम पांडे चर्चेत राहण्यासाठी नेहमी काही ना काही करत असते. नुकतीच ती कंगणाच्या लॉक अप (poonam pandey in lockup) शोमध्ये दिसली होती. हा शो ती जिंकू शकली नाही मात्र ती चर्चेत राहिली. आज (मंगळवारी) तिने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव (Obscene gestures) केल्याबद्दल नेटिझन्स तिला ट्रोल (Trolled) करत आहेत. ती अनेकदा ट्रोल होत असली तरी तिला याबद्दल काही फरक पडत नसल्याचे दिसते. त्यामुळे ती आपले उपद्व्याप चालूच ठेवते.

पूनम पांडेला कोणतं फळ आवडतं? (Which Fruit Poonam Pandey likes?)

भर रस्त्यात आंब्यांसोबत फोटो काढण्याची हौस भागवल्यानंतर तिने जाता-जाता तिला कोणतं फळ आवडतं हेही सांगितलं. तिला विचारण्यात आलं की, तुमचं आवडचं फळ कोणतं? यावर तिने उत्तर दिलं - आंबा. त्यानंतर अजून कोणतं फळ आवडतं असं विचारलं असता तिने केळ (Banana) आवडत असल्याचं सांगितलं. त्यानंतर ती निघून गेली.

वादग्रस्त वक्तव्य

२०११ मध्ये पूनम पांडेने एक वक्तव्य केलं होतं की, जर भारत वर्ल्ड कप जिंकला तर ती अंगावरचे सर्व कपडे काढेल. तिच्या या वक्तव्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. तसेच पूनम पांडे गोव्यातील न्यूड फोटोशूट प्रकरणात अटक झालेल्या व्यक्तीबद्दलही म्हणाली की, ही केवळ एक घटना आहे. याशिवाय पूनम पांडेने लग्नानंतरचा वाद आणि पतीवर केलेल्या मारहाणीच्या आरोपांवरही भाष्य केलं आहे. ती म्हणाली की, 'कोणत्याही महिलेला असा भयंकर अनुभव नको असतो. माझं लग्न झालं आणि मग माझ्यासोबत जे झालं ते खूप दुर्दैवी होतं. मी सध्या सिंगल आहे.' असं ती म्हणाली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : - सह्याद्रीत मुसळधार पावसामुळे घोड नदीला पूर

Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

Shocking : मिठाईचं आमिष दाखवतं झुडपात नेलं; अंगणवाडीत गेलेल्या ५ वर्षीय चिमुकलीवर १५ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

SCROLL FOR NEXT