Poonam Dhillon admitted to Lilavati Hospital  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress Hospitalised: प्रसिद्ध अभिनेत्रीची अचानक बिघडली तब्येत, तात्काळ रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत

Actress Hospitalised: ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लों यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Hospitalised: बॉलिवूडमधून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लों यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २२ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम ढिल्लों गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पत्रकार विकी लालवानी यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम ढिल्लों यांना डेंग्यूचे निदान झाले असून सध्या त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, अभिनेत्रीची प्रकृती आता सुधारत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पूनम ढिल्लों यांच्याशी सकाळी संपर्क साधला असता, त्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी चाहते आणि शुभचिंतक सोशल मीडियावरून प्रार्थना करत आहेत.

पूनम ढिल्लों यांची कारकीर्द

पूनम ढिल्लों या हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्रींपैकी एक आहेत. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी ‘नूरी’, रेड रोझ, दर्द , रोमांस , सोहनी महिवाल , तेरी मेहेरबानिया, समुद्र, सावरेवाली गाडी, कर्मा, नाम आणि माऊली यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच त्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या प्रश्नांसाठीही सक्रिय राहिल्या आहेत. सध्या त्या CINTAAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच, त्यांनी बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पहिली योजना बंद

Maharashtra News Live Update:विनर्स ॲकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई होणार

Latest Mangalsutra For Woman: नव्या नवरीसाठी फॅन्सी मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; खरेदी करण्याआधी वाचा 18K, 22K आणि 24K च्या किंमती

Weight Loss: सकाळ की संध्याकाळ? वजन कमी करण्यासाठी व्यायामाची योग्य वेळ कोणती? ५ आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT