Gemadpanthi Trailer Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Gemadpanthi Trailer Out: कोण वाजवणार कोणाचा गेम? 'गेमाडपंथी' ब्लॅक कॉमेडी आणि सस्पेन्स थ्रिलर वेबसीरीजचा ट्रेलर पाहून तुम्ही हादरून जाल

Planet Marathi New Web Series: प्लॅनेट मराठी आणखी एक वेबसीरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलं आहे.

Pooja Dange

Gemadpanthi Web Series Trailer Out: प्लॅनेट मराठी आणखी एक वेबसीरीज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलं आहे. संतोष कोल्हे दिग्दर्शित 'गेमाडपंथी' वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा एक हनी ट्रॅप असून यामध्ये कोण कोण अडकणार, हे २ जूनपासून दर शुक्रवारी प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर कळणार आहे.

दि फिल्म क्लिक स्टुडिओजने या वेबसीरीजची निर्मिती केली आहे. यात चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Latest Entertainment News)

ट्रेलरमध्ये चिकूच्या किडनॅपिंगचा प्लॅन बनताना दिसत आहे. आता हा चिकू कोण? आणि त्याला का किडनॅप करत आहेत. याशिवाय हनीच्या लिपस्टिक लावण्यामागचं नेमकं रहस्य काय? या सगळ्याचीच लवकरच उत्तरं मिळतील.

या सगळ्या गोंधळात भल्याभल्यांची वाट लागणार असून एकापेक्षा एक मोठे गेमही होणार आहेत. यात कोण कोणावर भारी होणार, हे 'गेमाडपंथी' पाहिल्यावरच कळेल. बोल्डनेसने भरलेली ही वेबसीरीज कॉमेडी, थ्रिलर आणि रहस्यमयही आहे.

दिग्दर्शक संतोष कोल्हे म्हणतात, ''टीजर पाहून अनेकांनी मला फोन, मेसेज केले. काय आहे नक्की 'गेमाडपंथी'? यातील विविध पात्रं एकमेकांचा गेम करत असतानाच स्वतःच एखाद्या गेमचे शिकार बनत आहेत. आता हे गेम कसे होत आहेत आणि 'गेमाडपंथी' नक्की काय आहे, हे प्रेक्षकांना वेबसीरीज पाहताना कळेलच. यात अनेक दर्जेदार कलाकार आहेत.''

'गेमाडपंथी'बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख,संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ही वेबसीरीज शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रेक्षकांना आवडेल अशी आहे. 'गेमाडपंथी' म्हणजे विनोद, रहस्य, प्रेम, थ्रिल असे संपूर्ण पॅकेज आहे. यातील सगळेच कलाकार उत्तम विनोदवीर आहेत आणि या कलाकारांपैकी अनेकांनी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बोल्ड भूमिका साकारल्या आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

iran and israel war News : गॅसनं वाढवलं तळीरामाचं टेन्शन; देशात दारुचा दुष्काळ पडणार?

बीड पुन्हा हादरलं! कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांच्या टोळीकडून एकावर डोळ्यात मिरची पावडर टाकून जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT