KGF 2 Instagram @kgf2official
मनोरंजन बातम्या

KGF 2 Craze In Japan : भारताप्रमाणे जपानमध्येही ‘KGF 2’ ची क्रेझ कायम, ‘सलाम रॉकी भाई’च्या घोषणेने थिएटर दणाणले

KGF 2 Released In Japan : भारताप्रमाणे जपानमध्ये देखील KGF 2 चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

Pooja Dange

KGF 2 Video Goes Viral : दाक्षिणात्य चित्रपट 'केजीएफ'ने भारतीय प्रेक्षकांना वेड लावले आहे. प्रश्नात नील दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आणि बनवले. प्रदेशात देखील या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. जपानमध्ये 'केजीएफ २' १४ जुलैला प्रदर्शित झाला. भारताप्रमाणे जपानमध्ये देखील या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर 'केजीएफ २'चे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रेक्षक चित्रपटाचं आनंद लुटणं दिसत आहेत. तसेच त्यांनी यशचा मास्क लावला आहे. तसेच दुसऱ्या व्हिडीओमध्ये 'सलाम रॉकी भाई' असे म्हणताना दिसत आहेत. (Latest Entertainment News)

जपानमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहून नक्कीच चित्रपटाचा गगनात मावेनासा झाला असेल. काही महिन्यापूर्वी 'आरआरआर' हा चित्रपट देखील जपानमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याची तुफान क्रेझ जपानमध्ये दिसली होती.

'केजीएफ' चित्रपटाचा पहिला पार्ट २१ डिसेंबर, २०२८ ला प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरघोस प्रतिसाद दिला होता. माऊथ पब्लिसिटीने या चित्रपटाला यशस्वी केले होते. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर 'केजीएफ २'च्या दुसऱ्या भागविषयी प्रेक्षकांना खूपच उत्सुकता होती.

१४ एप्रिल, २०२२ रोजी 'केजीएफ २' प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 'केजीएफ २'च्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन ५३.९६ कोटी होते. तर चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन ४३४.७० कोटी होते. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT