Jhoome Jo Pathaan Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Movie Controversy: पठान सिनेमावर कात्री लागणार; सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना दिले आदेश

सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटामध्ये बदल करण्याचे आदेश निर्माता आणि दिग्दर्शक यांना दिले आहेत.

Pooja Dange

Prasoon Joshi On Pathaan Movie: शाहरुख खानचा 'पठान' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दीपिकाने 'बेशरम रंग' या 'पठान' चित्रपटातील गाण्यामध्ये परिधान केलेल्या कपड्यांमुळे अनेक टीका, विरोध आणि आंदोलने झाली. या चित्रपटावरून सेन्सॉर बोर्डवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटामध्ये बदल करण्याचे आदेश निर्माता आणि दिग्दर्शक यांना दिले आहेत. सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी याबाबचे आदेश

सीबीएफसीच्या अध्यक्षांनी यशराज फिल्म्सला 'पठान' चित्रपटामध्ये सुधार करून सुधारित चित्रपाटाची आवृत्ती सादर करण्यास सांगितले आहे. तसेच ते बदल त्यांनी बोर्डाच्या मार्गदर्शनानुसार करावे असे आदेश सुद्धा दिले आहेत. त्यांनी या बदल करण्याबाबत निर्मात्यांना कोणतीही सूचना दिलेल्या नाहीत.' (Movie)

'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणे प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. हे गाणे 12 डिसेंबरला प्रदर्शित झाले. दीपिका पदुकोणच्या कपड्यांमुळ हिंदूंच्या भावना दुखावल्याच्याही चर्चा झाल्या होत्या. मध्य प्रदेश सरकारनेही हा चित्रपट मध्य प्रदेशात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे सांगितले होते.

प्रसून जोशी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "पठान चित्रपट सीबीएफसीमधील परीक्षा आयोगासमोर प्रमाणपत्रासाठी आला होता, ज्याची कसून तपासणी करण्यात आली आणि समितीने निर्मात्यांना चित्रपट आणि गाण्यांमध्ये काही बदल करण्याची सूचना केली." प्रसून जोशी म्हणाले, 'सीबीएफसीचे काम सर्जनशीलता आणि लोकांच्या भावनांमध्ये संतुलन राखणे आहे. भारतात संस्कृती आणि श्रद्धा यांना खूप महत्त्व दिले जाते. यामुळे, आपण काळजीपूर्वक कंटेन्ट तयार केली पाहिजे. निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातील नाते टिकवून ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, यापूर्वीही मी असे म्हटले आहे.

'गरजेनुसार सर्व आवश्यक बदल करून अंतिम कंटेन्ट सादर केल्यानंतर 'पठान' चित्रपटाला प्रमाणपत्र दिले जाईल.' दरम्यान, बेशरम रंग या गाण्यावर मध्य प्रदेशातील उलेमा बोर्डानेही आक्षेप नोंदवला होता. इस्लामचा चित्रपटामध्ये नकारात्मक प्रचार केल्यानी उलेमा बोर्डाने विरोध केला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्हा न्यायालयात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. (Shah Rukh Khan)

'पठान' चित्रपटातील 'झूम जो पठान' या चित्रपटाचे नवे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. पठाणमध्ये जॉन अब्राहम देखील महत्त्वाची भूमिका आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली; नेमंक कारण काय?

Ashram School : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; नऊ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांना म्हाडाने दिली खुशखबर, ५२८५ घरांबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

SCROLL FOR NEXT