Parineeti Chopra - Raghav Chadha Wedding Video
Parineeti Chopra - Raghav Chadha Wedding Video Instagram @parineetichopra
मनोरंजन

Parineeti Chopra Share Video: परीकथेत असंच लग्न होत असेल? परिणीती चोप्राने शेअर केला लग्नाचा क्युट व्हिडीओ

Pooja Dange

Parineeti Chopra Share Wedding Video:

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न अजूनही चर्चेत आहेत. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान परिणीती चोप्राने तिच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा २४ सप्टेंबरला उदयपूर येथील लीला पॅलेस येथे विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला बॉलिवूड आणि राजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित होते. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या फोटोंनी सोशल मीडियावर आधीच मार्केट जाम केलं आहे. तर परिणीती चोप्राने तिच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. परिणीती व्हिडीओ शेअर करताच व्हायरल झालं आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नाचा आनंद घेताना दिसत आहेत. जेव्हा वरात येत तेव्हा परिणीती लपून-छपून राघवला बघत असते. तर राघव देखील लक्ष परिणितीकडे असत. या दोघांचा हा व्हिडीओ खूपच सुंदर आहे.

परिणीती चोप्राने शेअर केलेल्या या व्हिडीओची सुरुवात त्याच्या वेडिंग लोकेशनच्या लॉन्गशॉटने होते. त्यानंतर राघव तयारी करत असल्याचे दाखविण्यात आलं आहे. परिणीती

जेव्हा लग्नमंडपात येते तेव्हा राघव तिला एखाद्या दोरीने जवळ खेचावं तसं जवळ ओढतो. परिणीती चोप्रा त्याला फ्लाईंग किस करते. वरमाळा घातल्यानंतर राघव, परिणीतीच्या कपाळावर किस करतो.

विशेष म्हणजे परिणितीने वरमाळा घालताना राघवची गाणं गाताना देखील दिसत आहे. परिणितीने हा व्हिडीओ शेअर करत तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, माझ्या नवऱ्यासाठी... मी गायलेलं अतिशय महत्त्वाचं गाणं... तुझ्याकडे चालत येताना, तुझ्या गळ्यात हार घालताना मी हे शब्द गुणगुणत होते.... ओ पिया, चल चले आ' हे कॅप्शन देत परिणितीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

परिणीती आणि राघव यांच्या या व्हिडीओवर अनेक सेलेब्रिटी कमेंट करून दोघांचे कौतुक करत आहेत. (Latest Entertainment News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

OBC Girls Education Fees | अल्प उत्पन्न गटातील मुलींची फी सरकार भरणार | Marathi News

Maratha Reservation: जिल्हानिहाय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मराठा कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच नोटीसा

मराठ्यांचा रास्तारोको!Maratha अंदोलकांना पोलिसांकडून नोटीस.| Marathi News

Manoj Jarange Patil यांच्या नेतृत्वात आज रास्तारोको!| Marathi News

Pune मध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा!| Marathi News

SCROLL FOR NEXT