Raghav Chadha Parineeti Chopra Engagement saam tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Raghav Engagement: परिणीती-राघव चड्डाचा झाला साखरपुडा! दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले फोटोज

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement : राघव चड्डा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

Chandrakant Jagtap

Raghav Chadha Parineeti Chopra Engagement Updates :अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आप नेते राघव चड्डा यांची जोडी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. आज अखेर या दोघांनी त्यांच्या नात्याला नाव दिलं आहे. या दोघांनी साखरपुडा केला आहे. राघव चड्डा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी अखेर शनिवारी (१३ मे) रोजी दिल्लीतील कपूरथला हाउस येथे साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून गोड फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे.

दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट सोहळा पार पडला. या सोहळ्यात दोघांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. या सोहळ्याला प्रियंका चोप्रा जोनासचाही उपस्थित होते. प्रियांका चोप्रा जोनास ही परिणीतीची बहीण आहे. (Latest Entertainment News)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या समारंभाला उपस्थिती लावली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे त्यांच्या पत्नीसोबत समारंभात उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेही या साखरपुड्याला उपस्थित होते. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी देखील या जोडप्याला आशिर्वाद दिले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT