Pankaj Tripathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pankaj Tripathi Father Died: 'OMG 2' अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; पंकज त्रिपाठीच्या वडिलांचे निधन

Pankaj Tripathi Father's Death: अभिनेता पंकज त्रिपाठीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pankaj Tripathi Father Died At 99:

अभिनेता पंकज त्रिपाठीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले आहे. समोर आलेल्या बातम्यांनुसार, पंकज त्रिपाठीचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे निधन झाले आहे.

बनारस तिवारी 99 वर्षांचे होते. त्यांच्या मूळ गावी बेलसंड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिनेता त्याच्या मूळ गावी रवाना झाला आहे.

पंडित बनारस तिवारी यांचा मृत्यू आजारामुळे झाला की वयाशी संबंधित समस्यांमुळे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पंकज त्रिपाठी वडिलांच्या खूप जवळ होते. अभिनेत्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पंकज त्रिपाठी मूळचे बिहारमधील गोपालगंजचे आहेत. अभिनय कारकिर्दीमुळे ते मुंबईत राहतात, पण त्याचे आई-वडील अजूनही त्यांच्या मूळ गावातच राहत होते.

अभिनेत्याच्या वडिलांवर आज गावातच अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये वडिलांचा उल्लेख केला आहे. लहानपणी गावात त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवून तो अनेकदा भावूकही झाले आहेत.

एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्याने सांगितले होते की त्याच्या वडिलांना त्याच्या कामामध्ये अजिबात रस नाही. त्यांचा मुलगा पंकज त्रिपाठी चित्रपटसृष्टीत काय काम करतो हेही त्यांना माहीत नाही. पंकज त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांचे वडील एकदाच मुंबईत आले होते. इथली मोठमोठी घरं आणि इमारती त्यांना आवडल्या नाहीत. (Latest Entertainment News)

एकदा पंकज त्रिपाठीने मीडियाशी संवाद साधताना सांगितले होते की, त्याच्या वडिलांची पंकजने अभिनेता व्हावा अशी मुळीच एकदा पंकज त्रिपाठीने एका मीडिया संभाषणात सांगितले की, त्याच्या वडिलांची इच्छा नव्हती की त्याने अभिनेता व्हावे. मुलाने शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची मुळीच इच्छा होती. मुलाने शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, असे त्यांच्या वडिलांना वाटत होते.

पंकज त्रिपाठीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या ते 'OMG 2' मध्ये दिसत आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fried Rice Recipe: रात्रीचं जेवण बनवायचा कंटाळा आला आहे? 10 मिनिटांत बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्राई़ड राईस

Maharashtra Live News Update: सोन्याच्या दागिन्यांचा मोह आवरला नाही आणि दोन अल्पवयीन मुलांनी केला 80 वर्षीय वृध्देचा खुन

Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT