Pankaj Jha Criticized Pankaj Tripathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pankaj Jha Accused Actor Pankaj Tripathi : 'स्ट्रगलचा ढोल बडवणारे...', 'पंचायत'मधील आमदाराचा पंकज त्रिपाठींवर निशाणा

Chetan Bodke

सध्या प्रेक्षकांमध्ये 'पंचायत ३' वेबसीरीजची कमालीची क्रेझ आहे. येत्या २८ मे ला ही वेबसीरीज 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ'वर स्ट्रीम होणार आहे. सध्या या वेबसीरीजमधील सर्वच कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. सीरीजमधील आमदार चंद्र किशोर (विधायकजी) यांचे पात्र साकारणाऱ्या पंकज झा यांनी बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पंकज झा यांनी पंकज त्रिपाठी यांच्या स्ट्रगलच्या काळाला खूप ग्लोरीफाय केल्याचा आरोप केला आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील सुलतानच्या भूमिकेसाठी आपण पहिली पसंती असल्याचा दावाही पंकज झा यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. पण कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी त्यांची जागा घेतली आणि पंकज त्रिपाठीला साइन केले.

पंकज झा बॉलिवूड इंडस्ट्रीतले एक सुप्रसिद्ध कलाकार आहे. त्यांनी अनेक चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. अभिनेत्याने नुकतंच 'ललनटॉप सिनेमा'ला दिलेल्या मुलाखतीत 'स्ट्रगल'वर भाष्य केले आहे. त्यांना 'स्ट्रगल' हा शब्द अजिबात आवडत नाही, असं विधान मुलाखतीत केले आहे.

ते मुलाखतीत पुढे म्हणाले, "मला 'संघर्ष' हा शब्द अजिबात आवडत नाही. जर तुम्ही तुमच्या आवडीचं काम करायचं ठरवलं ना तर ते काम तुम्ही त्याचा आनंद घेऊन करायला हवं. बरोबर आहे की नाही? आपण इंडस्ट्रीत पाहिलं असेल, अनेकांना त्याच्या स्ट्रगलला ग्लॅमराइज करायला आवडते. काही जण सांगतात, आम्ही भाजी विकली, छोट्या घरात राहिलो, चप्पल चोरली. मला वाटतं की, आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक परिस्थिती ही आपल्याला काही ना काही शिकवून जाते."

पंकज झा यांनी पुढे मुलाखतीत सांगितले की, "या लोकांचं एक कॉम्प्लेक्स आहे. जर तुम्ही त्यांना मान सन्मान दिला नाही किंवा जर तुम्ही तुमचं मत मांडले तर ते नाराज होतात. ते इतके दुःखी होतात की ते पुन्हा तुमच्यासोबत काम करण्यास नकार देतात. त्यांच्या मित्रांनाही तुमच्यासोबत काम करू नका असे सांगतात. हे माझ्या बाबतीत घडले आहे. मी 'गॅग्स ऑफ वासेपूर' मध्ये मी सुलतानची भूमिका करणार होतो. मला मुकेश छाबरा यांचा फोन आला होता. मी पाटण्यात होतो, त्यानंतर काही दिवसांनी मी घरी परतलो. तोपर्यंत त्यांनी माझ्याऐवजी त्या भूमिकेसाठी दुसऱ्याला कास्ट केले होते. सुलतानच्या भूमिकेसाठी मला प्रॉडक्शन हाऊसचा फोन आला नाही."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT