Panchayat Star Cast Fee Saam Tv
मनोरंजन बातम्या

Panchayat Star Cast Fee : सचिवजी की प्रधानजी ? 'पंचायत ३'साठी सर्वाधिक मानधन कोणी घेतले?

Panchayat 3 Web Series : सध्या प्रेक्षकांना 'पंचायत ३' वेबसीरीजची कमालीची उत्सुकता लागली आहे. 'पंचायत ३' सीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना किती मानधन मिळालंय, नुकतंच याची माहिती मिळाली आहे.

Chetan Bodke

सध्या प्रेक्षकांना 'पंचायत ३' वेबसीरीजची कमालीची उत्सुकता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या वेबसीरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २८ मे रोजी ही वेबसीरीज 'अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ'वर रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये या वेबसीरीजची तुफान चर्चा होताना दिसत आहे. या सीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना किती मानधन मिळालंय, त्याचीही माहिती समोर आली आहे.

टाईम्स नाऊ नवभारतच्या रिपोर्टनुसार, सचिवजी अर्थात अभिनेता जितेंद्र कुमारने या सीझनसाठी सर्वाधिक मानधन घेतले आहे. अभिनेता जितेंद्र कुमारला या सीरीजच्या एका एपिसोडसाठी ७० हजार रुपये मानधन मिळालं आहे. 'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार जितेंद्र कुमारच आहे

प्रधानजी बृजभूषण दुबे यांची भूमिका साकारणारे अभिनेते रघुबीर यादव यांना या सीरीजच्या एका एपिसोडसाठी ४० हजार रुपये मानधन मिळालं आहे. तर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी या सीरीजमध्ये प्रधानजीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. प्रधानजीच्या पत्नीचे नाव मंजू देवी असं असून या एका एपिसोडसाठी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी ५० हजार रुपये इतके मानधन मिळाले आहे.

फुलेरा ग्राम पंचायतचे कार्यालय सहाय्यक विकासचे पात्र साकारणाऱ्या अभिनेता चंदन रॉयलाही एका एपिसोडसाठी २० हजार रुपये मानधन मिळालं आहे. तर उप-प्रधान प्रल्हाद पांडेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता फैजल मलिकलाही एका एपिसोडसाठी २० हजार रुपये मानधन मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT