Chaleya Dance Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Chaleya Viral Video: ‘जवान’ची भुरळ पाकिस्तानी अभिनेत्रीलाही, ‘चलेया’ गाण्यावर केला अफलातून डान्स; VIDEO व्हायरल

Chaleya Dance: पाकिस्तानी अभिनेत्रीचा ‘जवान’मधील ‘चलेया’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Chaleya Dance Viral Video

सध्या ॲटली दिग्दर्शित ‘जवान’ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ७ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांना फारच भुरळ पडली आहे. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी चित्रपटाने तब्बल १० चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला.

नुकताच चित्रपटाने जगभरात १००० कोटींचा टप्पा पार केला असून तर देशात चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाची वाढती क्रेझ पाहता चित्रपटातील गाण्यांचीही सध्या तुफान चर्चा सुरु आहे. सध्या सोशल मीडियावर एका पाकिस्तानी अभिनेत्रीचा ‘जवान’मधील ‘चलेया’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सध्या शाहरुख आणि नयनताराच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा होत आहे. चित्रपटाप्रमाणेच चित्रपटातील गाणेही खूपच चर्चेत आहेत. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा आणि तिच्या मित्रांचा ‘चलेया’ या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या स्टेपने प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून सध्या तिच्या डान्सची प्रचंड चर्चा होत आहे.

हानिया अमिर असं या अभिनेत्रीचं नाव असून तिचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. ‘चलेया’ गाण्यावर डान्स करताना हानिया अमिरने ‘गंदा’ अशा आशयाचं कॅप्शन देत तिने व्हिडीओ शेअर केला आहे.

हानिया अमिरही पाकिस्तानातील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचा सोशल मीडियावर डान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या तिच्या डान्सची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा होत आहे. हानिया अमिर ही खूप आधीपासून किंग खानची फार मोठी चाहती असून तिने अनेकदा शाहरुखच्या गाण्यांवरही रील्स बनवून शेअर केल्या आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल फार उत्सुकता होती. चित्रपटाच्या कथेने आणि दमदार स्टारकास्टमुळे चित्रपटाला उत्तम यश मिळालं आहे. चित्रपटाने आतापर्यंत जगभरात १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर देशामध्ये ५०० कोटींचा टप्पा गाठलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video:भाच्याच्या लग्नात मामाचा मृत्यू, बेफाम डान्स करताना अचानक कोसळले अन्...!

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

राज्यकर्ते गावात आल्यावर त्यांना रट्टे...; मनोज जरांगेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, काय म्हणाले? VIDEO

Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT