Actress Death X
मनोरंजन बातम्या

Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Actress Suspicious Death : ७६ वर्षीय अभिनेत्री आयशा खानचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सापडला. आठवडाभरापूर्वी आयशाचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

प्रसिद्ध अभिनेत्री आयशा खानचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आयशाचा मृतदेह तिच्या कराची येथील घरात आढळला. तिचा मृत्यू एका आठवड्यापूर्वी झाला असे म्हटले जात आहे. कराचीमधील गुलशन-ए-इकबाल ब्लॉक ७ मधील अपार्टमेंटमधून आयशाचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्या वेळेस मृतदेहाची स्थिती वाईट होती असे म्हटले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा खान मागील काही वर्षांपासून एकटी राहत होती. ती लोकांना भेटत नसे. तिच्या घरातून येणाऱ्या दुर्गंधीबद्दलची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. कुणीही दरवाजा न उघडल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. आत गेल्यावर त्यांना आयशा खानचा मृतदेह आढळला.

आयशा खानचा मृतदेह कराचीतील जिन्ना रुग्णालयात नेण्यात आला. त्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यानंतर मृतदेह सोहराब गोठ येथील एधी फाउंडेशनच्या शवागारात पाठवण्यात आला. आयशाचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. आयशाचे शेजारी आणि नातेवाईक यांची चौकशी सुरु आहे.

२२ नोव्हेंबर १९४८ रोजी आयशाचा जन्म झाला. मनोरंजन विश्वात तिने नाव कमावले होते. त्यातही टेलिव्हिजन क्षेत्रात आयशाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री खालिदा रियासतची आयशा मोठी बहीण होती. अनेक लोकप्रिय पाकिस्तानी मालिकांमध्ये तिने काम केले होते. काही चित्रपटांमध्येही ती झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत १ हजार २८५ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT