Paaru Zee Marathi Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Paaru: आदित्य- पारूच्या आयुष्यात प्रेमाची अबोल भावना भरणार एक नवा रंग; की या दोघांच्या प्रेमाला लागणार कोणाची नजर?

Paaru Marathi Serial: झी मराठी वाहिनीवरील 'पारू' मालिका एक मनोरंजक वळण घेत आहे. येणारे भाग प्रेक्षकांची उत्कंठा आणखीन वाढवणार आहे. आदित्य- पारूच्या आयुष्यात प्रेमाची नवी सुरुवात होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Paaru Zee Marathi Serial: झी मराठी वाहिनीवरील सुरु असलेली पारू या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या गोड पारुला बघायला प्रेक्षकांना फार आवडते. तसेच तिचा चपळपणा देखील प्रेक्षकांना खुश करून जातो. आता 'पारू' मालिका एक मनोरंजक वळण घेत आहे. येणारे भाग प्रेक्षकांची उत्कंठा आणखीन वाढवणार आहे.

आदित्य समोर त्या डोळ्यांच्या मागच्या व्यक्तीच रहस्य समोर आल्यावर आणि हे केळल्यावर कि ती व्यक्ती पारूचं आहे तो घाईघाईने पारूकडे पोहचतो, पण ती आधीच निघून गेली आहे. आदित्य व्यथित आहे कि जेव्हा त्याला सत्य समजलं, तेव्हाच पारू त्याला सोडून गेली. या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नाही. पारूच्या आयुष्यावर याचा परिणाम होत आहे हे जाणून मारुती, तो सौम्यपणे ठाम स्वरात आदित्यला पारूपासून दूर राहण्यास सांगणार आहे. पण आदित्य आता पारुच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला आहे. मारुतीचं बोलणं स्वीकारणं आदित्यला अशक्य होतंय.

त्याला पारूला परत आणायचंच आहे या निश्चयाने आदित्य अहिल्याला पारूला घरी आणण्यासाठी तयार करतो. पण तो स्वतः एक निर्णय घेतो कि तो पारूला आपल्या प्रेमाची कबुली देणार नाही. तो तिचा आदर करेल, तिच्यावर कुठलाही दबाव टाकणार नाही. आता, पारू आणि आदित्य दोघांनाही माहित आहे की ते एकमेकांवर प्रेम करतात, पण त्यांना त्यांच्या मर्यादाही ठाऊक आहेत. त्यांनी आपल्या भावनांना रोखून धरायचं ठरवलंय. त्यांच्या नात्यात न बोलता समजून घेण्याची गोड कसरत निर्माण झाली आहे.

जेव्हा दोन प्रेम करणारी माणसं एकमेकांना पाहण्यास आतुर असतात, पण व्यक्त करायला धजावत नाहीत. प्रत्येक छोटासा क्षण पाहण्यासारखा आहे - चुकून एकमेकांकडे टाकलेली नजर, सहज लागलेला स्पर्श, एक साधं संभाषण हे सगळं खास होऊन जातं. जे आधी नेहमीसारखं वाटायचं, त्यातच आता जादू भरते. हे प्रेम त्यांच्या आयुष्यात अबोल भावना आणि नजरेतून एक नवा रंग भरणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका "पारू" दररोज संध्या. ७:३० वा. फक्त झी मराठीवर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT