OTT Release Movies and Webseries Saam TV
मनोरंजन बातम्या

OTT Released This Week: ‘पंचायत ३’ ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ओटीटीवर रिलीज; 'मे'च्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी

New OTT Released This Week on Prime Video, Zee5 and Jio Cinema: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांसाठी ओटीटीवर मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत.

Chetan Bodke

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. ओटीटीवर या आठवड्यात प्रेक्षकांना अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट आणि वेबसीरिज पाहायला मिळणार आहे. खरंतर ओटीटी हे माध्यम प्रेक्षकांना मनोरंजनासाठी फार उत्तम माध्यम ठरत आहे. सिने रसिकांचा सध्या ओटीटीकडे कल जास्त आहे.

Amazon Prime Video, Netflix, Zee 5, Disney Plus Hotstar, Jio Cinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना अनेक दमदार चित्रपट आणि वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत. जाणून घेऊया या आठवड्यात कोण कोणत्या कलाकृती रिलीज होणार आहेत…

Panchayat 3 Poster

पंचायत ३- Panchayat 3

'पंचायत' आणि 'पंचायत २'ला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी या सीरीजचा तिसरा भाग रिलीज झालेला आहे. प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून 'पंचायत ३' सीरिजचा नवा सीझन आज अर्थात २८ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरीजमध्ये खूप वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. तुम्ही ही सीरिज ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

Swatantryaveer Sawarkar Film Poster

स्वातंत्र्यवीर सावरकर - Swatantryaveer Sawarkar

रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Sawarkar) चित्रपट येत्या २८ मे रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी ५ (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. रणदीपने या चित्रपटात अभिनयही केला असून चित्रपटाचं दिग्दर्शनही त्याने केलं आहे.

Dedh Bigha Zameen

देढ बिघा जमीन- Dedh Bigha Zameen

प्रतिक गांधी आणि खुशाली कुमार स्टारर 'देढ बिघा जमीन' हा चित्रपटही ओटीटीवर रिलीज होणार आहे. चित्रपटाचे कौटुंबिक कथानक असून एका व्यक्तीच्या संघर्षाची कथा चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २८ मे रोजी 'जिओ सिनेमा' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Illegal 3 Season 3

इल्लीगल- Illegal

‘इल्लीगल’ वेब सीरिजचा तिसरा सीझन २९ मे रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत नेहा शर्मा, पियुष मिश्रा, अक्षय ओबेरॉय, नील भूपलम आणि सत्यदीप मिश्रा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

SCROLL FOR NEXT