OTT Release This Week Saam Tv
मनोरंजन बातम्या

OTT Release This Week: 'पाताल लोक 2, 'द रोशन्स, हिना खाननं पुनरागमन अन्...'; हा आठवडा ओटीटी प्रेमींसाठी होणार खास! जाणून घ्या लिस्ट

OTT Release: दर आठवड्याप्रमाणे, या आठवड्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक उत्तम चित्रपट आणि वेब शो प्रदर्शित होणार आहेत. हे शो तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरी बसून सहज पाहू शकता.

Shruti Kadam

OTT Release This Week: नवीन आठवडा सुरू होताच लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की या आठवड्यात ओटीटीवर काय नविन पहायला मिळणर आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की जानेवारी २०२५ चा तिसरा आठवडा देखील सिनेमाप्रेमींसाठी खास असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला ओटीटीवर प्रत्येक शैलीचे चित्रपट आणि वेब मालिका पाहायला मिळणार आहेत.

अनस्टॉपेबल

हा एक हॉलिवूड चित्रपट आहे जो एका वास्तविक जीवनातील कथेवर आधारित आहे. ही कहाणी आहे एका अमेरिकन कुस्तीपटू अँथनी रोबल्सची, ज्याचा जन्मता एकच पाय आहे पण तो पुढे कुस्तीपटू म्हणून राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियन बनतो. हा चित्रपट १६ जानेवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

XO किट्टी सीझन 2

XO किट्टी चा दुसरा सीझन पूर्वीपेक्षा जास्त विनोदी असणार आहे. किट्टी सॉन्ग कोव्ही सोलमधील कोरिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये परतली आहे आणि यावेळी ती केवळ एका लव्ह ट्रँगल मध्ये अडकली नाही आहे तर तिच्या दिवंगत आईच्या भूतकाळाचाही शोध घेताना दिसणार आहे. हा शो १६ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध होणार आहे.

बॅक इन ॲक्शन

'बॅक इन ॲक्शन' हा एक ॲक्शन-कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये जेमी फॉक्स आणि कॅमेरॉन डियाझ एका दशकानंतर पुन्हा एकत्र येत आहेत. हे दोघे एमिली आणि मॅटची भूमिका साकारत आहेत. जे सीआयएचे माजी कर्मचारी आहेत आणि त्यांची ओळख उघड झाल्यानंतर त्यांना पुन्हा हेरगिरीच्या जगात बोलावले जाते. हा शो १७ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेलबॉय: द क्रुक्ड मॅन

२०२४ चा सुपरहिरो हॉरर चित्रपट 'हेलबॉय: द क्रुक्ड मॅन' १७ जानेवारी २०२५ रोजी लायन्सगेट प्लेवर प्रदर्शित होईल. जेफरसन व्हाइट, ॲडेलिन रुडोल्फ आणि जॅक केसी इत्यादी कलाकार त्यात दिसतील.

पाताळ लोक: सीझन 2

'पाताळ लोक'च्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते कारण त्याचा पहिला सीझन प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता पाताळ लोकचा दुसरा सीझन १७ जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जुने कलाकार पुन्हा एकदा दमदार अभिनय करताना दिसणार आहेत.

सेव्हरन्स सीझन 2

सेव्हरन्स सीझन 2 हे मनाला भिडणारे नाटक त्याच्या दुसऱ्या सीझन घेऊन परत येणार आहे आणि लुमेन इंडस्ट्रीजच्या भयानक गोष्टींचा जगाचा उलगडा होईल. जिथे कर्मचारी त्यांचे काम आणि वैयक्तिक जीवन वेगळे ठेवण्यासाठी एका वादग्रस्त प्रक्रियेतून जातात. १७ जानेवारी रोजी ते Apple TV Plus वर प्रसारित होईल.

द रोशन्स

'द रोशन्स' ही हृतिक रोशनच्या कुटुंबावर आधारित एक माहितीपट मालिका आहे, जी त्याच्या कुटुंबाच्या तीन पिढ्यांचा मागोवा घेते. ही मालिका १७ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

गृहलक्ष्मी

अभिनेत्री हिना खान तिच्या 'गृहलक्ष्मी' या नवीन वेब सिरीजमधून पडद्यावर पुनरागमन करत आहे. या मालिकेत हिना 'लक्ष्मी'च्या भूमिकेत दिसणार आहे आणि ही मालिका १६ जानेवारीपासून फक्त EPIC ON वर प्रसारित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT