Best upcoming OTT releases and theatrical movies for this weekend  saam tv
मनोरंजन बातम्या

OTT Releases: शुक्रवारी OTT आणि थिएटरमध्ये मनोरंजनाची मेजवानी; 'दायरा'पासून 'रणबाली'पर्यंत 8 चित्रपट आणि वेब सीरिज होणार रिलीज

FRIDAY OTT AND THEATRE RELEASES : एकाच दिवशी म्हणजेच शुक्रवारी ८ वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि सीरिज रिलीज होत असल्याने, प्रेक्षकांना त्यांच्या आवडीनुसार थिएटर किंवा घरबसल्या ओटीटीवर मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.

Shruti Vilas Kadam

नोव्हेंबर महिन्याचा दुसरा शुक्रवार चित्रपट आणि वेब सीरिजच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. येत्या 13 नोव्हेंबरला OTT प्लॅटफॉर्मसह चित्रपटगृहांमध्येही विविध चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये करीना कपूरचा 'दायरा', विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचा 'रणबाली' तसेच तमन्ना भाटियाच्या 'बांद्रा' या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय क्राइम थ्रिलर, मर्डर मिस्ट्री आणि रोमँटिक कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरमधील आठ कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मग, जाणून घेऊया या आठ नव्या रिलीजबद्दल.

बांद्रा

अभिनेत्री तमन्ना भाटियाची प्रमुख भूमिका असलेला 'बांद्रा' हा चित्रपट आता OTT वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा एका महत्त्वाकांक्षी नवोदित गँगस्टर थ्रिलर चित्रपट आहे. 1990 च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री तारा जानकी हिच्या रहस्यमय मृत्यूचा तपास तो करतो. या तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. हा चित्रपट तुम्हाला ZEE5 वर पाहायला मिळणार आहे.

मर्डर इन गॅलिसिया

रहस्य आणि गुन्हेगारीवर आधारित 'मर्डर इन गॅलिसिया' ही क्राइम थ्रिलर सीरिज प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन येणार आहे. रात्रीच्या वेळी एका महिलेवर हल्ला होतो आणि त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात होते. तपास करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला पीडितेच्या पतीवर संशय येतो. वरकरणी निरागस वाटणाऱ्या या व्यक्तीच्या वागण्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रकरणाचे रहस्य उलगडताना कोणते धागेदोरे समोर येतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

स्टुडंट ऑफ द इयर : आफ्टर डार्क

अभिनेता संजय कपूर यांची मुलगी या नव्या मर्डर मिस्ट्री वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर : आफ्टर डार्क' या सीरिजची कथा अदितीची जुळी बहीण आयशा हिच्या रहस्यमय मृत्यूभोवती फिरते. बहिणीच्या मृत्यूमागचे सत्य शोधण्यासाठी अदिती स्वतः तपास सुरू करते. या प्रवासात अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे.

पारिवारिक मनु रंजन

पंकज त्रिपाठी आणि अदिती राव हैदरी यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'पारिवारिक मनु रंजन' ही रोमँटिक कॉमेडी सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या सीरिजची कथा लखनऊमध्ये राहणाऱ्या रंजन या अविवाहित तरुणाभोवती फिरते. दिल्लीमध्ये प्रॉपर्टी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या हेलनची त्याच्याशी भेट होते आणि त्यानंतर रंजनच्या आयुष्यात अनेक बदल घडू लागतात.

हार्टलँड

'हार्टलँड' ही रहस्य आणि थराराने भरलेली सीरिज आहे. जवळपास दोन दशकांपासून प्रसिद्धीपासून दूर असलेली माजी कंट्री म्युझिक स्टार मिस्टी जोन्स आपल्या बेपत्ता भाचीचा शोध घेण्यासाठी नॅशव्हिलला परतते. सुरुवातीला भाचीचा शोध घेण्यापुरती मर्यादित असलेली ही मोहीम पुढे एका मोठ्या खून प्रकरणाच्या तपासात बदलते. या तपासादरम्यान अनेक धक्कादायक रहस्ये उघड होतात.

दायरा

अभिनेत्री करीना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'दायरा' हा चित्रपट आता OTT वर प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करण्यात चित्रपटाला यश आले नाही. आता थिएटरनंतर हा चित्रपट Netflix वर पाहता येणार आहे

रणबाली

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला 'रणबाली' हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता थिएटरमधील प्रदर्शनानंतर महिनाभराच्या आतच हा चित्रपट OTT वर येत आहे. त्यामुळे ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

गोंधळ

मराठी चित्रपट 'गोंधळ' पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आलेला हा चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषेसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. लोककथा आणि मानसशास्त्रीय रहस्याचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट या शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

कोणते चित्रपट आणि सीरिज पाहणार?

एकूणच13 नोव्हेंबरचा शुक्रवार चित्रपट आणि वेब सीरिजच्या मनोरंजनाची प्रेमींसाठी मोठी मेजवानी घेऊन येणार आहे. Netflix वर अनेक नवे पर्याय उपलब्ध होणार असून JioHotstar, ZEE5 आणि SonyLIV वरही वेगवेगळ्या सीरिज पाहता येतील. त्याचबरोबर 'गोंधळ'सारखा मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या वीकेंडला घरबसल्या OTT वर चित्रपट पाहायचे असोत किंवा थिएटरमध्ये जाऊन मनोरंजन करायचे असो, प्रेक्षकांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : प्रौढ महिलेला पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा पूर्ण अधिकार, हायकोर्टाचा मोठा निर्णय!

Maharashtra News Live Update: भीमाशंकर दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला अपघात; नागमोडी वळणाचा अंदाज न आल्याने गाडी रस्त्याखाली

Veg Puff Recipe: बेकरीसारखे खुसखुशीत व्हेज पफ बनवा घरच्या घरी; चहासोबत खाण्यासाठी वाचा सोपी रेसिपी

Date Tips For Women: पहिल्यांदा डेटला गेल्यानंतर पुरूषांना महिलांकडून काय अपेक्षा असतात?

Weight Loss : दिवाळीचा फराळ खाऊन वजन वाढलंय? मग ५ दिवसांचा डाएट प्लान करा फॉलो, फिगर पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT