Myra Vaikul saam tv
मनोरंजन बातम्या

Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परीचा डान्स बघाच; कौतुक करावं तितकं थोडंच!

गोकुळाष्टमीचं औचित्य साधत प्रेक्षकांच्या लाडक्या परीनं म्हणजेच मायरा वैकुळनं तिचा खास डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : संपूर्ण देशभरात आज दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषचे वातावरण आहे. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळत आहे. या जल्लोषात कलाकार कसे मागे राहतील बरं..? कलाकारही आपल्या वेगवेगळ्या अंदाजात कृष्ण जन्माष्टमी साजरी करत आहेत. अशातच, गोकुळाष्टमीचं औचित्य साधत प्रेक्षकांच्या लाडक्या परीनं म्हणजेच मायरा वैकुळनं(Myra Vaikul) तिचा खास डान्स व्हिडिओ (Social media) सोशल मीडियावर शेअर केला आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील परी म्हणजेच मायरा वैकुळ कायम चर्चेत असते. मायरानं अगदी फार कमी कालावधीत निरागसतेने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याचसोबत मायराचे सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत.

मायराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती कृष्णाची राधा होऊन 'वो किसना है' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मायराने लाल आणि हिरव्या रंगाची घागरा-चोळी परिधान केली आहे. या व्हिडिओमध्ये मायरा नाचताना खूप क्यूट दिसत आहे. मायाराच्या या व्हिडीओवर तिचे अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

'माझी तुझी रेशीमगाठ' ही झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. त्याचबरोबर या मालिकेतील छोटीशी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळ ही या मालिकेची केंदबिंदू बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT