Mahabharat  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mahabharat :'महाभारत' मालिका जुन्या आठवणींना उजाळा देणार, नव्या रुपात पाहायला मिळणार पौराणिक कथा

आता जागतिक प्लॅटफॉर्मवर महाभारत ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतीय समाजाची एक पिढी सुप्रसिद्ध 'महाभारत'(Mahabharat) ही मालिका दूरदर्शनवर पाहत मोठी झाली आहे. आता जागतिक प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर महाभारत ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच, लॉस एंजेलिसमधील जागतिक डिस्ने फॅन इव्हेंट 'डी२३ एक्स्पो २०२२' मध्ये तीन भारतीय सीरीजची घोषणा करण्यात आली. त्यापैकी एक म्हणजे महाभारत. महाभारत या मिलीकेची निर्मिती मधु मंटेना, मिथोवर्स स्टुडिओ आणि अल्लू एंटरटेनमेंट करत आहेत.

वेब सीरीज लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. तत्पूर्वी डिस्ने प्लस हॉटस्टारने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर फर्स्ट लूकही शेअर केला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारचे कंटेंट हेड गौरव बॅनर्जी आणि इंटरनॅशनल कंटेंट, मधु मंटेना यांनी 'डी२३ एक्स्पो २०२२' या इव्हेंटमध्ये महाभारत या आगामी सीरीजची घोषणा केली आहे. या वेब सीरीजची कथा महाभारतावर आधारित असणार आहे. यासह करण जोहरच्या सेलिब्रिटी चॅट शो 'कॉफी विथ करण' आगामी सीझन ८ ची घोषणा करण्यात आली आहे. याची निर्मिती जोहर, अपूर्व मेहता आणि अनिशा बेग यांनी धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत केली आहे. जोहर, मेहता आणि सोमेन मिश्राचा बॉलिवूड-सेट ड्रामा सीरीज 'शोटाईम' चा देखील यात समावेश आहे.

निर्माते मधु मंटेना यांनी एका निवेदनात जारी केले आहे. 'महाभारत' हे भारतातील सर्वात प्राचीन महाकाव्यांपैकी एक आहे. कथा फार जुनी असून, प्राचीन श्लोकांमध्ये लपलेल्या शहाणपणाचे अनेक धडे आपल्या आजच्या जीवनात फार म्हत्वाचे आहेत'. डिस्ने प्लस हॉटस्टार इंडियाचे कंटेंट हेड गौरव बॅनर्जी म्हणाले 'गेल्या काही वर्षांत, भारत एक कंटेंट पॉवरहाऊस देश म्हणून उदयास आला आहे. जो इतर देशांतील कथांद्वारे भाषा आणि सांस्कृतिक सीमा ओलांडत आहे. आता आम्हीदेखील महाभारताची निर्मिती मोठ्या स्तरावर करणार आहोत. महाभारताची कथा खूपच रंजक आहे'.

महाभारतावर पहिला सिनेमा १९६५ मध्ये आला होता. यानंतर, १९८८ मध्ये, बीअर चोप्रा निर्मित टिव्ही मालिका आली जीने प्रेक्षकांचे मने जिंकली. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळचं स्थान निर्माण केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Mixed Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती बनवावी हा प्रश्न पडलाय? मग मिक्स कडधान्याची झणझणीत उसळ ट्राय कराच

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

Chief Minister Fadnavis: सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT