Nora Fatehi In FIFA World Cup Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi: फिफा वर्ल्ड कपमध्ये नोरा फतेहीने केला तिरंग्याचा अपमान; चाहत्यांचा संताप अनावर

नोरावर चुकीच्या पद्धतीने तिरंगा पकडणे, तो फडकावणे आणि त्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.

Pooja Dange

Nora Fatehi News: नोरा फतेहीचा धमाकेदार डान्स आणि ग्लॅमरस लूकची देशातच नव्हे तर जगभरात चर्चा आहे. नोराच्या या लोकप्रियतेमुळे तिला कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. फिफा वर्ल्ड कप 2022 च्या फॅन फेस्टिव्हलमध्ये नोराने दमदार डान्स केला. स्टेजवर तिरंगा फडकवताना नोराने जय हिंदच्या घोषणाही दिल्या. पण यादरम्यान नोराकडून एक मोठी चूक केली, ज्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

नोरा फतेही व्हिडिओमध्ये म्हणते, 'भारत फिफा वर्ल्ड कपमध्ये नसला तरी आमच्या संगीतातून, नृत्यातून आम्ही या फेस्टचा एक भाग आहोत. नोराचे हे शब्द ऐकून तिथे उपस्थित लोकांना खूप आनंद झाला, ते सुद्धा ओरडून तिला साथ देऊ लागले. नोरासोबतच प्रेक्षकही जय हिंदचा जयघोष करत होते. स्टेडियममध्ये भारत, भारताविषयी घोषणा देऊ लागले. नोरा तिरंगा फडकवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे.

नोरावर चुकीच्या पद्धतीने तिरंगा पकडणे, तो फडकावणे आणि त्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. सर्वप्रथम नोराला तिरंगा स्टेजवर फेकून देण्यात आला. स्टेजवर पडलेला झेंडा उचलताना नोरा देशाचा तिरंगा नसून स्कार्फ असल्यासारखे हलवताना दिसली. नोराने तिरंगा उलटा फडकावला तेव्हा हद्द तर झाली. तिने झेंड्याला स्कार्फ सारखा हवेत धरला आणि स्वतःभोवती गुंडाळला. स्टेजवरून खाली उभ्या असलेल्या व्यक्तीला नोराने ज्या पद्धतीने तिरंगा परत केला त्यावरही टीका होत आहे. (Nora Fatehi)

नोरा फतेहीने तिरंगा चुकीचा पकडून तो उलटा फिरवल्याने ती वादात सापडली आहे. यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत. तिरंगा चुकीचा पकडला गेला आहे, तिरंगा देण्याची पद्धत अत्यंत चुकीची होती, हे तिरंग्याचा अपमान केल्यासारखे आहे, नोरा तिरंग्याचा आदर करत नाही, नोराने तिरंग्याचा अपमान केला, अशा कमेंट युजर्स करत आहेत. युजरच्या म्हणण्यानुसार, नोराला तिरंगा कसा फडकावायचा हे देखील माहित नाही. हे अपमानास्पद आहे. नोरा फतेहीच्या या कृतीमुळे लोक खूप निराश झाले आहेत. नेटकऱ्यांकडून होणाऱ्या ट्रोलिंगवर नोराकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (Social Media)

नोरा फतेही फिफा वर्ल्ड कप 2022 मुळे चर्चेत आली आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नोराच्या डान्स परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्सचे म्हणणे आहे की, बॅकग्राउंड डान्सरने अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे. त्याच वेळी, काही लोकांना असे वाटते की हा फक्त एक गैरसमज आहे. आता सत्य काय आहे, फक्त नोराच चांगले सांगू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT