Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : अरबाजबद्दल निक्की पहिल्यांदाच मनमोकळं बोलली; म्हणाली, माझा कम्फर्ट झोन...

Nikki-Arbaz : बिग बॉस घरात भांडणांचा ओघ सुरू असताना अशातच निक्कीने अरबाजविषयीच्या भावना पहिल्यांदाच व्यक्त केल्या आहेत. ती काय बोली जाणून घ्या...

Shreya Maskar

बिग बॉस (Bigg Boss Marathi) घरात कायमच अरबाज आणि निक्कीच्या नात्यावरून चर्चा होताना पाहायला मिळते. त्या दोघांमध्ये काही वेळा वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. मात्र अनेक वाद होऊन सुद्धा निक्की (Nikki Tamboli ) आणि अरबाज (Arbaz Patel) आता सोबत आहे. तसेच गेम दरम्यान एकमेकांसाठी बोलताना पाहायला मिळते. त्याच्या प्रेमाच्या चर्चा कायमच सोशल मीडियावर रंगलेल्या असतात.

नुकत्याच घरात झालेल्या टास्क दरम्यान निक्कीने अरबाजविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती अरबाज बद्दल भरभरून बोलताना दिसली आहे. तिला अरबाज सोबतचं नात कायम ठेवायचं आहे. घरातील व्यक्तींना आपल्या कंफर्ट झोन असलेल्या व्यक्तीविषयी भावना व्यक्त करण्याच्या टास्कमध्ये निक्कीने अरबाजविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

निक्कीने अरबाजविषयी म्हटलं की, अरबाज हा माझा कम्फर्ट झोन आहे. आधी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, पण घरात आल्यावर आमच्यात खूप चांगली मैत्रीही झाली. तसेच वादही झाले. पुढे निक्की म्हणाली , माझं अस होत की, जर मी हा खेळ अरबाजसोबत सुरु केला आहे तर मला तो खेळ त्याच्या सोबत संपवायचा आहे. आज मी जगासमोर सांगते की, मला अरबाजच्या विरोधात जायचे नाही. मला तो मला मनापासून आवडतो. आमची मैत्री फक्त इथेच नाही तर घराबाहेरही कायम राहावी.'

अरबाजने मात्र बिग बॉसच्या घरात आधीच तो कमिटेड असल्याचे सांगितले आहे. अनेक वेळा अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्राने सोशल मीडियावर निक्की आणि अरबाजच्या नात्यांवर पोस्ट करून आपले मत व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT