Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : निक्की अन् अभिजीतच्या मैत्रीत पडणार फुट? बिग बॉसच्या घरात वादाचा नवा अंक

Bigg Boss Marathi Day 46 : 'बिग बॉस मराठी' च्या घरात आज खूप भांडणं पाहायला मिळणार आहे. निक्की अन् अभिजीतच्या मैत्रीत दुरावा येणार आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' च्या घरात रोज एक राडा पाहायला मिळत आहे. गेम खेळण्यासोबत वारंवार भांडणे देखील केली जात आहेत. घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला आहे. त्यामुळे घरातील वातावरण बिघडलेले पाहायला मिळत आहे. आज अभिजीत आणि वैभवमध्ये राडा होणार आहे. तसेच निक्की आणि अभिजीत मधील विश्वास आणि मैत्रीत फुट पडल्याचे पाहायला मिळेल.

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) नव्या प्रोमोमध्ये अभिजीत आणि वैभव वाद घालताना दिसत आहेत. अभिजीत वैभवला म्हणतोय, "अरे बाबा मी तुझ्या मागे नाही बोललोय." यामध्ये निक्की म्हणतेय,"आम्ही याच्यावर परत विश्वास ठेवला आणि त्याने तेच केलं." यावर अभिजीत निक्कीला म्हणतोय,"मित्र समजून मी तुझ्याकडे बोलायला येतो ना हीच माझी चूक आहे. यापुढे तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही. असा मित्र आपल्या आयुष्यात कधी ठेऊ नये." अशा शब्दात तो नाराजी व्यक्त करतो.

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अभिजीत आणि निक्कीचं नॉमिनेशनवरुन भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. अभिजीत निक्कीला म्हणतोय,"नॉमिनेशनचा आणि जान्हवीचा काय संबंध". निक्की म्हणतेय,"जान्हवी तुला तुझ्या टीममध्ये हवी होती". या आठवड्यात निक्की नॉमिनेट झाल्याने ती अभिजीतकडे आपला संताप व्यक्त करत आहे. 'बिग बॉस मराठी' च्या या आठवड्यात मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. तसचे आठवड्यात कोण घराबाहेर जाणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT