Salman Khan big boss 18 INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

Big Boss 18 Update : चर्चांना लागला फुलस्टॉप, भाईजानने केला बिग बॉस १८ चा प्रोमो शूट

Salman Khan : अभिनेता सलमान खान याने नुकतेच बिग बॉस सीजन १८ चा प्रोमो शूट केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ बिग बॉसच्या सेटवरून समोर आला आहे.

Saam Tv

Big Boss Season 18 : बॉलीवूडचा भाईजान लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस १८ चे होस्टिंग करणार की नाही याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चांना फुलस्टॉप लागला आहे. अभिनेता सलमान खान याने नुकतेच बिग बॉस सीजन १८ चा प्रोमो शूट केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ बिग बॉसच्या सेटवरून समोर आला असून यात सलमान खान या शोचा प्रोमो शूट करताना दिसत आहे. सलमानला गेल्या काही महिन्यांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना, या सीझनमध्ये तो शोचा भाग नसल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता प्रोमो शूटिंगची बातमी आल्याने त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.

माध्यमांच्या रिपोर्टनुसार, सलमान खानने शोचे शूटिंग सुरू केले आहे. अलीकडेच सलमान खानने मुंबई फिल्मसिटीमध्ये बिग बॉस 18 चा प्रोमो शूट केला. शूटिंग संपल्यानंतर सलमान खानने पापाराझींना पोज दिली. ब्लेझर आणि पँटसह नेव्ही ब्लू शर्ट परिधान केलेल्या फॉर्मल लूकमध्ये अभिनेता दिसला.

बिग बॉस 18 च्या प्रोमोच्या शूटिंगच्या काही वेळ आधी सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट सिकंदरचे शूटिंग करत होता. अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान सलमान खानच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. सध्या तो पूर्णपणे बरा झालेला नाही, असे असूनही, कामाच्या कमिटमेंटमुळे त्याने बिग बॉस 18 चा प्रोमो शूट केला आहे. बिग बॉस 18 चा ग्रँड प्रीमियर 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सलमान शो करणार नसल्याची होती चर्चा

सलमान खान बिग बॉस १८ होस्ट करणार नसल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. वास्तविक, १४ एप्रिल रोजी त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याशिवाय त्याला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव तो यावेळी बिग बॉस होस्ट करणार नसल्याचे वृत्त होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

Maharashtra Live News Update: अमोल कोल्हे यांचा गौप्य स्फोट

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT