BBMARATHI INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

BBMarathi : बिग बॉसच्या घरात वर्षाताईंचा ठसका; नवा प्रोमो आला समोर

Big Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरातील वाद, भांडण रोजच प्रेक्षकांना दिसत असते. मात्र येणाऱ्या भागात घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन खेळीमेळीचे वातावरण तयार झाले असल्याचे प्रेक्षकांना दिसणार आहे.

Saam Tv

BBMarathi Update : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीजन हा त्यात सुरू असलेल्या भांडणासाठी ओळखला जात आहे. टीम A आणि टीम B मध्ये सतत खटके उडत असतात. त्याची नेटकरी सोशल मिडियावर चर्चा देखील करतात. मात्र आता बिग बॉसच्या घरातील एक नवा प्रोमो कलर्स मराठीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून त्यात घरात सर्व सदस्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण बघायला मिळत आहे.

या प्रोमोमध्ये वर्षाताई अरबाजची फिरकी घेत आहेत. अरबाज वर्षाताई यांना चिप्स मागत आहे. त्यावर वर्षाताई त्याला, ''मला मस्का लाव. मी सगळ्यात सुंदर स्त्री आहे, असं म्हण'', असे म्हणताना दिसत आहेत. त्यावर अरबाज देखील त्यांची तारीफ करत, ''ताई तुम्ही सगळ्यात सुंदर स्त्री आहात'' असे म्हणतोय. त्यावर वर्षाताई पुन्हा, ''निक्की आणि मी भांडत असताना नेहमी माझी बाजू घेशील असं म्हण''. असे सांगतात. त्यावर अरबाज ''मी नेहमी तुमची आणि तिची बाजू घेणार ताई'', असे म्हणतो. या संभाषणाने घरातील सदस्यांमध्ये एकच हशा पिकल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे आता दोन्ही टीम भांडण सोडून एकत्र आल्याचे चित्र येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घनश्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला आहे. त्यानंतर या आठवड्यात संग्राम चौगुले बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहे. संग्रामच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे पुन्हा घरातील समीकरणं बदलणार असल्याच दिसणार आहे. तर दुसरीकडे घरात येताच संग्रामने अरबाज आणि निक्कीला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT