36 Guni Jodi Serial Timing Changes Netizen Get Angry Saam Tv
मनोरंजन बातम्या

36 Guni Jodi Serial: ‘अरे काय चाललंय, एक वेळ ठरवाना...’, झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ च्या सतत बदलणाऱ्या वेळेमुळे नेटकरी संतापले

36 Guni Jodi Serial Latest News: झी मराठीवरील ‘३६ गुणी जोडी’ मालिकेच्या टेलिकास्ट टायमिंगमध्ये सतत बदल होत असल्यामुळे प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत.

Chetan Bodke

36 Guni Jodi Serial Timing Changes Netizen Get Angry

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर झी मराठीवरील अनेक मालिका चर्चेत आहेत. कधी कथानकामुळे तर कधी निर्माते बदलत असलेल्या सततच्या वेळांमुळे त्या मालिकांची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. लवकरच येत्या काही दिवसामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला एक नवी मालिका येत आहे. एका नव्या मालिकेमुळे काही जुन्या मालिकेच्या वेळेमध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. निर्माते मालिकेच्या टेलिकास्ट टायमिंगमध्ये सतत बदल करत असल्यामुळे प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका प्रसारित झाली, त्यावेळी ही काही मालिकांच्या वेळेमध्ये बदल केला. टेलिकास्ट टायमिंगमध्ये प्रोड्युसर सतत बदल करत असल्यामुळे नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हार्दिक जोशीची येत्या ४ डिसेंबरपासून ‘जाऊ बाई गावात’ ही मालिका रात्री ९:३० वाजता झी मराठीवर टेलिकास्ट होणार आहे. या मालिकेमुळे ‘३६ गुणी जोडी’सह ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेच्या वेळेमध्ये बदल केला आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका ४ डिसेंबरपासून दुपारी २ वाजता, तर ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका दुपारी २.३० वाजता झी मराठीवर टेलिकास्ट होणार आहे.

मालिकेच्या वेळेमध्ये सतत बदल करत असल्यामुळे नेटकरी प्रचंड भडकले आहे. ‘अरे काय चाललंय, एक वेळ ठरवाना, जेवढे Actressचे ड्रेस बदलले नाही तेवढ्या वेळा मालिकेचा वेळ बदलला आहे’, ‘प्रत्येक वेळी ३६ गुणी जोडीलाच का टार्गेट?’, ‘अरे काय तुम्ही?, रात्री ११:००चा वेळ एकदम बेस्ट होता ना, दुपारी कोणाला वेळ आहे.’, ‘त्यापेक्षा पहाटे ३:३० वाजता ठेवा सोईचं जाईल लोकांना’ असं म्हणत नेटकऱ्यांनी झी मराठीला चांगलंच ट्रोल केलं आहे. ‘मराठी टेलिबझ’ या इन्स्टाग्राम चॅनलवरुन नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स शेअर केल्या आहेत. (Trolled)

मालिकेबद्दल सांगायचे तर, आयुष संजीव आणि अनुष्का सरकते प्रमुख भूमिकेत असलेली ही मालिका सध्या सायंकाळी टेलिकास्ट केली जात आहे. मालिकेच्या वेगवेगळ्या कथानकाप्रमाणे प्रेक्षकांना वेगवेगळा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT