Kokan Hearted Girl Video Shared on Maharashtra Politics Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walavalkar on Maharashtra Politics: ‘महाराष्ट्राचं राजकारण कमी गजकर्ण...’; कोकण हार्टेड गर्लने व्यक्त केलं राज्याच्या राजकारणावर परखड मत

Ankita Pramod Walavalkar Video: सोशल मीडिया एन्फ्लुएंसर अंकिता प्रमोद वालावलकर हिने ही राज्याच्या राजकारणावर परखड मत व्यक्त केलं.

Chetan Bodke

Ankita Walavalkar Video Shared on Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी २ जुलै अर्थात रविवारी राज्याच्या राजकारणात मोठं राजकीय बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झालाय.

रविवारी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा देत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय भूकंपावर सर्वच क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वांनी आपली प्रतिक्रिया दिली असून काही मराठी सेलिब्रिटींनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. नुकतंच कोकण हार्टेड गर्ल अंकिती प्रभु वालावलकर हिने एक व्हिडिओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली.

आपल्या खास शैलीत आणि मिश्किल अंदाजात व्हिडिओ शेअर करत अंकिता म्हणते, “तर guys. महाराष्ट्राचं राजकारण कमी गजकर्ण जास्त झालेला असा. या गजकर्णात आपण खूप काही शिकण्यासारखे असा. म्हणजे गेल्या पाच वर्षात सगळ्यांनी वाटून महाराष्ट्र खाल्लेले हा. त्याच्यामुळे तुमच्या मताचं तसाही काही आदर नाही. त्यामुळे स्वतःची मत आहेत ती देणं जरा कमी कारा.” (Kokan Hearted Girl Ankita Pramod Walawalkar)

नंतर पुढे अंकिता म्हणते, “लोकांचे कमेंट सेक्शन जे भरतास त्यालाही कोणी विचारू नाही. तुमच्या मताला कोण विचारत नाही तर तुमच्या कमेंटला कोण विचारतो. हाही तुम्ही विचार करा. आणि मेन म्हणजे आता हा रिल स्टार साठी कंटेंट आहे. म्हणजे दर पावसात महाराष्ट्राचे राजकारणी आम्हाला कंटेंट देतं. म्हणजे ओके मध्ये एकदम झालं आता पण ही भाकरी पलटली, उलटली. तवो करापलो. काय वाटोळं केल्यानी. रविवारची सोय झालेली असा. तर आता बघुया पुढच्या रविवारी काय घडतंय. अशा घडामोडी या महाराष्ट्रात चालत राहतील. या राजकारणाची तुमका आता सवय करुक घेऊक हवी.” असा व्हिडिओ अंकिताने पोस्ट केलाय. (Trolled)

अंकिता प्रमोद वालावलकरबद्दल बोलायचे तर, ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा ती अनेक सामाजिक विषयांवर व्हिडिओ बनवत शेअर करत असते. तिचे रिल्स आणि विविध व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. अंकिताला अनेकदा तिच्या व्हिडीओंमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतं. अंकिताने काही महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली होती. अंकिता सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या सभेबद्दल अपडेट देत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

Maharashtra Rain Live News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

SCROLL FOR NEXT