Sushant Singh Rajput News, Sushant Singh Rajput Death Case, Rhea Chakraborty Latest News saam tv
मनोरंजन बातम्या

सुशांत सिंहसाठी रिया द्यायची गांजा - चरसची ऑर्डर, NCB चा खळबळजनक दावा

सुशांतच्या बँक अकाऊंटमधून ‘पूजा सामग्री’च्या नावाने ड्रग्जची खरेदी केली जात असल्याचं देखील एनसीबीने आपल्या मसुद्यात म्हटलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा अद्याप पूर्ण छडा लागलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण थोडं शांत झालं होत. मात्र, आता पुन्हा एकदा या प्रकरणी एनसीबीने (NCB)आरोपपत्राचा मसुदा न्यायालयासमोर सादर केला आहे. NCB ने ड्रग्ज प्रकरणी आरोपांचा मसुदा तयार केला आहे. ज्यामध्ये रिया आणि इतर ३५ आरोपींवर उच्च समाज आणि बॉलिवूडमधील लोकांना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. (Sushant Singh Rajput News)

हे देखील पाहा -

या आरोपपत्रामध्ये सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी, दोन कर्मचारी आणि इतर अशा एकूण ३५ आरोपींची नावं या मसुद्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या आरोपींनी मिळून सुशांतला ड्रग्जच्या आहारी जाण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही आहे. असा दावा या मसुद्यात करण्यात आला आहे. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि त्यांच्या इतर काही मित्रांनी मिळून सुशांतला ड्रग्जचं व्यसन लावल्याचं या मसुद्यात नमूद करण्यात आलं आहे.

त्यासोबतच सुशांतच्या बँक अकाऊंटमधून ‘पूजा सामग्री’च्या नावाने ड्रग्जची खरेदी केली जात असल्याचं देखील एनसीबीने आपल्या मसुद्यात म्हटलं आहे. रिया चक्रवर्ती गांजा खरेदी करून सुशांतपर्यंत पोहोचवत होती. तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी सुशांतच्या बँक अकाऊंटमधून पूजा सामग्रीच्या नावाखाली ड्रग्जची खरेदी करत होता, असा देखील उल्लेख एनसीबीच्या आरोपपत्राच्या मसुद्यात करण्यात आला आहे. मृत्यूच्या २ वर्ष आधीपासूनच सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज मिळत होते, असा दावा या मसुद्यामध्ये करण्यात आला आहे.

सुशांतच्या मृत्यूने मोठा धक्का बसला होता

सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला. बॉलिवूड स्टारच्या मृत्यूवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. सुशांतच्या कुटुंबीयांनी अभिनेत्याच्या मृत्यूसाठी रिया चक्रवर्तीला जबाबदार धरले आहे. सुशांत प्रकरणाचा तपास अनेक तपास यंत्रणांनी केला आहे पण मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सुशांतचे चाहते आजही त्याला न्याय मिळावा अशी याचना करत आहेत. (Rhea Chakraborty Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT