MasterChef India Winner Instagram @master.chef.india.7
मनोरंजन बातम्या

'MasterChef India' Season 7: नयनज्योती सैकिया ठरला 'मास्टरशेफ इंडिया 7'चा विजेता, ट्रॉफी-रोख रक्कमेसह जिंकली प्रेक्षकांची मने

MasterChef India Winner: मास्टरशेफ इंडिया सीझन 7ला अखेर त्याचा विजेता मिळाला.

Pooja Dange

Nayanjyoti Saikia Wins 'MasterChef India': मास्टरशेफ इंडिया 7 ने देशभरातील स्वयंपाक घरांमध्ये शिरकाव केला. यावेळचा हा ७वा सीझन अनेक कारणांनी चर्चेत होता. सर्व स्पर्धकांची आवड आणि कौशल्य पाहून प्रेक्षकांनी अखेर शोचा विजेता निवडला आहे. मास्टरशेफ इंडिया सीझन 7ला अखेर त्याचा विजेता मिळाला. मास्टरशेफ इंडिया 7 ची ट्रॉफी आसामच्या नयनज्योती सैकियाने जिंकली आहे.

मास्टरशेफ इंडिया 7 च्या विजेत्याबद्दल आधीच अंदाज बांधले जात होत. तर यात आसामच्या नयनज्योती सैकियाच्या नावाची चर्चा होती आणि तोच विजयी होणार असा लोकांचं दृढ विश्वास होता.

प्रेक्षकांचे मत योग्य असल्याचे सिद्ध झाले. नयनज्योतीने सर्व अडथळे पार करत अखेर शोच्या जजची मने जिंकली. मास्टरशेफ इंडिया 7 च्या ट्रॉफीसह, नयन ज्योतीने शेफचे जॅकेट आणि 25 लाख रुपयांची रक्कम जिंकली आहे.

नयनज्योती सैकिया हा आसामचा आहे. मास्टरशेफ इंडियामध्ये त्याच्या स्वीट डिशसाठी त्याचे सर्वाधिक कौतुक झाले आहे. तसेच तो इतर पदार्थ देखील भन्नाट बनवतो. २६ वर्षीय नयनज्योतीने कधीही व्यावसायिक कुकिंगच शिक्षण घेतले नाही. स्वत:हून नवनवीन पद्धती शोधून त्याने स्वयंपाकात प्रभुत्व मिळवले आणि लोकांची मने जिंकली.

नयन ज्योती यांनी गिरिजानंद चौधरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, गुवाहाटी येथून पदवी प्राप्त केली आहे. मास्टरशेफ इंडियाच्या आधी, 2020 मध्ये, नयनज्योतीने नॉर्थईस्ट कुकिंग चॅम्पियनशिपमध्ये पहिले पारितोषिक जिंकले.

एकदा नयन ज्योतीने सांगितले की त्याच्या वडिलांना त्याने कुकिंगमध्ये करिअर करावे असे वाटत नव्हते, पण विकास खन्ना यांनी त्याच्या वडिलांना समजावले.

यावेळी मास्टरशेफ इंडिया 7 शेफ रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना यांनी जज केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News: कार ६० फूट खोल ओढ्यात कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावर थरारक घटना, पाहा,VIDEO

Sharad Pawar : खडकवासला धरण, कात्रज बोगदा ते तथाकथित पुणेकरांनी दिलेला त्रास; शरद पवार महात्मा फुलेंवर काय म्हणाले?

Onion Chutney Recipe : फक्त ५ मिनिटांत बनवा कांद्याची चटकदार चटणी, सिंपल रेसिपी आताच वाचा

Adult Star Passes Away: एडल्ट स्टार काइली पेजचे वयाच्या २८ व्या वर्षी निधन; ड्रगमुळे मृत्यू झाल्याचा संशय

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

SCROLL FOR NEXT