Aaliya Siddiqui After Eviction Saam TV
मनोरंजन बातम्या

Aaliya Siddiqui After Eviction : बिग बॉसच्या घराबाहेर येताच आलिया सिद्दीकी ; म्हणाली त्या एका व्यक्तीमुळे मला टार्गेट...

Aaliya Siddiqui On Eviction : नवाजुद्दीन आणि आलियाच्या घटस्फोटामुळे ती लोकांना माहित झाली होती.

Pooja Dange

Bigg Boss OTT 2 Update : 'बिग बॉस' हा लोकप्रिय शो आहे. बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व सुरू होऊन २ आठवडे होऊन गेले आहेत. बिग बॉस ओटीटीचं पर्व सध्या खूपच चर्चेत आहे. नुकतंच शोच्या दुसऱ्या आठवड्याच्या मध्येच आलिया सिद्दीकी घराबाहेर गेली आहे. आठवड्याच्या मध्यात झालेल्या इव्हिक्शनमुळे प्रेक्षकांच्या मनात बरेच पश्न उपस्थित झाले आहेत.

बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व स्पर्धंकामुळे गाजताना दिसत आहे. शोच्या दुसऱ्या आठवड्यात आलिया सिद्दिकी आणि जिया शंकर एलिमिनेट झाल्या होत्या. पण आठवड्याच्या मध्यात झालेल्या आलियाच्या इव्हिक्शनमुळे बऱ्याच चर्चा होत आहे. तर आता स्वतः आलियानेच या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

इंडिया टुडेशी बोलताना आलियाने टीकेवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे. आलिया म्हणाली, "मला कधीच असं वाटलं नव्हत की इतक्या लवकर मी घराबाहेर जाईन. मी कोणाच्या तरी विरुद्ध माझी बाजू मांडली म्हणून मला टार्गेट करण्यात आले. एका व्यक्तीचं नाव घेतल्यालर सर्व काही बदलून गेलं. या एकाच कारणामुळे मला घरातून आऊट केलं".

आलियाने वीकेंडच्या वॉरविषयी बोलताना म्हणाली, 'पहिल्याच वीकेंडच्या वॉरमध्ये सलमान खानने तिला वैयक्तिक आयुष्याबद्दल घरात बोलू नये असे सांगितले. लहानसहान गोष्टींवर माझी अपमान करायचे त्याचबरोबर मला घरातून ज्या प्रकारे घराबाहेर काढलं हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं'.

आलिया शोच्या आधीपासूनच चर्चेत होती. तिचा बॉयफ्रेंडसोबतच्या व्हायरल झालेल्या फोटोमुळे ती चर्चेचा विषय बनली होती. नवाजुद्दीन आणि आलियाच्या घटस्फोटामुळे ती लोकांना माहित झाली होती. त्याचबरोबर शोमध्ये जाण्यासाठी नवाजुद्दीननेच पाठिंबा दिल्याचं आलियानेच सांगितलं होतं. (Latest Entertainment News)

बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व हे स्पर्धंकांच्या वागण्यामुळे जास्त चर्चेत आहे. नुकतचं जद आणि आकांशा पुरीच्या लिपलॉकमुळे शोवर अनेक टीका होताना दिसत आहे. शोचा होस्ट सलमान खानवरही आता या प्रकरणामुळे आरोप होताना दिसत आहे.

आलियाच्या आधी शोमधून पलक पूरस्वानी एलिमिनेट झाली होती. तर शोच्या दुसऱ्याच दिवशी पुनीत सुपरस्टारला घरातून बाहेर काढण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra HSC Result: १२ वीचा निकाल 'Coming Soon'; रिझल्टबाबत नवी अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: विजेचा धक्का लागून बिहारच्या तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करणारा कोण? हल्लेखोर इंजिनीअरचे NASA कनेक्शन उघड

Raghav Chadha: राघव चड्ढा अन् परिणीतीच्या दिल्लीतील आलिशान घराचे फोटो व्हायरल

Samruddhi Mahamarg accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; वाहनाचा टायर फुटला अन्...VIDEO

SCROLL FOR NEXT