Dnyaneshwar Mauli Serial Update: सोनी मराठी 'ज्ञानेश्वर माउली' ही मालिका प्रेक्षकांना खूप जवळची आहे. या मालिकेतील ज्ञानेश्वर माउली आणि त्यांचा संघर्ष प्रेक्षकांच्या मनाला भिडतो. या मालिकेत माउलींच्या जीवनातले अनेक चढ-उत्तर दाखविण्यात आले आहेत. तसेच कलाकारांनी विविध महान व्यक्तींच्या भूमिका देखील साकारल्या आहेत. नवीन वळणांसह मालिका अंकी रंजक होत आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं.
प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताचा प्रवेश होणार आहे.
संतांच्या या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. संत चोखामेळा यांची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना ती आवडी देखील. संत नामदेव यांनीही प्रेक्षकांना भुरळ पडली. आता मालिकेत संत सेना महाराज यांचा प्रवेश होणार आहे.
संत सेना महाराज यांची भूमिका नंदेश उमप साकारणार आहेत. नंदेश उमप हे संगीत क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या भूमिकेची चर्चा प्रेक्षकांमध्ये होणार यात शंकाच नाही. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत सेना महाराज आणि संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडं यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारे असेल.
संत सेना महाराज हे न्हावी समाजाचे प्रमुख, ते आळंदीजवळून प्रवास करत आहेत हे समजताच माउली आणि त्यांची भावंडं त्यांना भेटण्यासाठी जातात. माउली आणि त्यांच्या भावंडांना संत सेना महाराज यांना भेटण्याची फार उत्सुकता आहे. माउली आणि संत सेना महाराज यांची भेट कशी असेल, हे आपल्याला मालिकेच्या येत्या भगत पाहायला मिळणार आहे.
संत श्रीज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सेना महाराज यांचा प्रवास 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेत दाखवला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.