Nana Patekar Saam TV
मनोरंजन बातम्या

सगळे सलोख्याने राहात असताना मध्येच बिबा घालणं योग्य नाही; 'द कश्मीर फाईल्स'वर नानांच वक्तव्य

इथले हिंदू आणि मुस्लिम हे इथलेच आहेत, त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच रहावं, द कश्मीर फाईल्स चित्रपटामुळं जे गट पडलेत, ते चुकीचे

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : इथले हिंदू आणि मुस्लिम हे इथलेच आहेत, त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे, त्यांनी एकत्रच रहावं, 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटामुळं जे गट पडलेत, ते चुकीचं असल्याचं मतं जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी व्यक्त केलं आहे. ते आज पुण्यातील लवळे येथील सिम्बायोसिस कॅम्पसमध्ये एका App च्या लाँचिंग कार्यक्रमात आले असता बोलत होते. (Nana Patekar's statement on the movie 'The Kashmir Files')

हा चित्रपट मी अद्याप पाहिला नसल्याने अधिकचं बोलणं उचित ठरणार नाही. मात्र एखाद्या चित्रपटावरून अशी काँट्रोव्हर्सी होणं योग्य नाही. हा तेढ कोणता समाज निर्माण करत नाही. ज्या व्यक्ती अशा पद्धतीने तेढ उसळवतात त्यांना हे प्रश्न विचारायला हवेत. सगळे सलोख्याने राहत असताना मध्येच बिबा घालणं योग्य नाही. चित्रपट पहा, त्यातील वस्तुस्थिती कोणाला पटेल, कोणाला पटणार नाही. त्यामुळे गट पडणं साहजिकच आहे. पण तेढ निर्माण करणं चुकीचं असल्याचंही नाना पाटेकर म्हणाले.

आपल्याला एकमेकांचा आधार वाटणं गरजेचं आहे. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही, असं जोपर्यंत दोन्ही समाजांना, तुम्हा-आम्हा भारतीयांना (Indian) वाटत नाही. तो पर्यंत हे असे पोळी भाजणारे खूप असतील. परदेशी व्यक्तीचा विषय आला के सगळे लगेच भारतीय होतात. मग अशावेळी जात-धर्म का आठवतात. त्यामुळे सर्वांनी आपण भारतीय आहोत एवढंच मानून चालायचं असं ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT