Nana Patekar Upcoming Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar On Latest Content: 'अत्यंत घाणेरडा कन्टेन्ट...', बॉलिवूड चित्रपटाविषयी नाना पाटेकर यांचं मोठं विधान

Nana Patekar On Bollywood Content: नाना पाटेकर यांनी शाहरुख खानचा हिट चित्रपट 'जवान' आणि नेपोकिड्सवर टीका केली आहे.

Pooja Dange

Nana Patekar Spoke About Nepotism:

दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते नाना पाटेकर यांनी मत्त्वाची भूमिका साकारली आहे.

ट्रेलर लाँच वेळी नाना पाटेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जिथे त्यांनी नाव न घेता शाहरुख खानचा हिट चित्रपट 'जवान' आणि नेपोकिड्सवर टीका केली आहे.

'द व्हॅक्सिन वॉर'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये एका पत्रकाराने नाना पाटेकर यांना विचारले की पॅरलल आणि कमर्शियल सिनेमा यात तुम्हाला काय फरक दिसतो, हा फरक अजूनही अस्तित्वात आहे का? यावर नाना पाटेकर यांनी अगदी त्यांच्या शैलीत उत्तर दिल.

नाना म्हणाले, 'सर्वात आधी या दोघांमध्ये जो फरक होता तो आता राहिलेला नाही. आधी हा फरक होता पण आता राहिले नाही. OTT आल्यानंतर आमच्या प्रत्येक चित्रपटाला एक व्यासपीठ मिळाले. आमच्याकडे जेवढे जास्त प्रेकशक असतील, तेवढे पैसे आम्हाला मिळतात. त्यामुळे पॅरलल चित्रपटाची अवस्था वाईट आहे. तुम्हाला काय वाटत... आता कोणत्या प्रकारचे चित्रपट हिट होत असतील.

जवानचे नाव न घेता नाना पाटेकर पुढे म्हणाले की, आजकाल लोक जे चित्रपट पाहतात आणि प्रेक्षकांना असं कन्टेन्ट पाहण्याची सक्ती केली जात आहे. नाना म्हणले की 'मी काल खूप हिट चित्रपट पाहत होतो. मी तो चित्रपट पूर्णपणे पाहूच शकलो नाही. मला तो चित्रपट पुढे बघण्याची इच्छाच होत नव्हती. पण असे चित्रपट खूप चालतात. सारखे सारखे असे चित्रपट, असा कन्टेन्ट प्रदर्शित केला जातो. जेणेकरून प्रेक्षकांना त्याची सवय व्हावी.'

नाना पाटेकर यांनीही नेपोटीज्मवर देखील त्यांचे मत व्यक्त केले. नाना म्हणाले, 'आता मी अभिनेता आहे. उद्या मला माझ्या मुलाने अभिनेता व्हावं असत वाटलं तर त्याला अभिन्न येत असेल किंवा नाही. पणतुम्ही तुमचे मत त्याच्यावर लादणार. एक चित्रपट अयशस्वी होईल, नंतर आणखी दोन आणि नंतर 10 चित्रपट असेच असतील.

त्यानंतर तुम्हाला त्याचे वाईट वाटू लागेल आणि हळुहळू तुम्ही अंगीकारायला सुरुवात कराल. असेच चित्र आज आपल्याकडे आहे. आपल्याकडे असे काही वाईट चित्रपट आहेत जे आपल्याला पाहण्यास भाग पडले जात आहे. पण आम्हाला वाटते की हा एक चांगला चित्रपट आहे. The Vaccine War सारखा चित्रपट आला तर कळत दोन्ही चित्रपटांमध्ये फरक आहे.

'वेलकम'मधील उदय शेट्टीची व्यक्तिरेखेला नाना पाटेकर यांनी साकारली होती. नाना 'वेलकम 2' मध्येही दिसले होते, पण फ्रँचायझीच्या 'वेलकम टू द जंगल'मध्ये त्यांना कास्ट करण्यात आलेले नाही. मंगळवारी 'द व्हॅक्सिन वॉर'च्या ट्रेलर लाँचवेळी या संदर्भात प्रश्न विचारला असता नाना पाटेकर म्हणाला, 'अशा चित्रपटात काम करणं जितकं अवघड आहे, त्यापेक्षा जास्त अवघड आहे असे चित्रपट बनवणं. ते जे काही करतात त्याला सलाम.

कास्ट न करण्याबाबत नाना पुढे म्हणाले, 'त्यांना वाटते की मी म्हातारा झालो आहोत, कदाचित म्हणूनच ते मला घेत नाहीत. पण प्रत्येकाला काम मिळते, तुम्हाला काम करायचे आहे की नाही यावर अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT