Nana Patekar Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar Death: 'त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही...'; नाना पाटेकरांच्या निधनाने जान्हवी किल्लेकर भावुक

Nana Patekar Death: नाना पाटेकर यांच्या निधनाने जान्हवी किल्लेकर भावुक झाली. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तिने नानांसोबत काम करण्याची संधी न मिळाल्याचे दुःख व्यक्त केले.

Shruti Vilas Kadam

Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी नाना पाटेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘बिग बॉस मराठी’फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनेही नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी जान्हवीला अश्रू अनावर झाले. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जान्हवी किल्लेकरने इन्स्टाग्रामवर नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहणारा व्हिडीओ शेअर केला. यावेळी तिने नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर आपली अवस्था कशी झाली, याबद्दल सांगितले. जान्हवी म्हणाली की, 'सकाळी जेव्हा ही बातमी समजली की, नाना पाटेकर आता आपल्याबरोबर नाहीत, तेव्हापासून माझी खूप चलबिचल झाले आहे. मला सारखं रडायला येतं आहे. मला माहीत नाही का? माझी नानांशी कधी वैयक्तिक अशी भेट झालेली नाही. पण ते आपल्या अभिनय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व होते.'

'नानांबरोबर कधीच काम करण्याची संधी मिळाली नाही’

जान्हवीने सांगितले की, 'अशा दिग्गज व्यक्तीबरोबर मला कधीच काम करायला नाही मिळालं, याचं खूप जास्त दुःख होतंय. ते आता आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्याबरोबर कधीच काम करण्याची संधी मिळाली नाही. हे माझं दुर्दैव आहे अशा भावना जान्हवीने व्यक्त केल्या. नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देताना जान्हवीचा अश्रूंचा बांध फुटला.

नेटकऱ्यांनीही वाहिली श्रद्धांजली

जान्हवीच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. एका नेटकऱ्याने कमेंट केली, भावपूर्ण श्रद्धांजली नाना. आणखी एकाने लिहिले, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नाटकं आणि चित्रपट गाजवलेल्या आपले सगळ्यांचे नटसम्राट नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, असा नटसम्राट पुन्हा होने नाही असा माणूस देवाला पण का आवडणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली नाना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIR: इंडिया आघाडीच्या आंदोलनादरम्यान ४२ निवृत्त न्यायाधीशांचे SIR ला समर्थन, थेट देशाच्या नावाने लिहिलं खुलं पत्र

90,000 पगार, तरी BMW, Volvo, 2 Mercedes कुठून आले? 3 तासांच्या सुनावणीत न्यायमूर्तींचे सचिन वाझेंना धडाधड प्रश्न; जामिनावर काय निर्णय दिला?

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या सूचना; एस. एम. जोशी पूल रिकामा करण्याचे आवाहन

Hotel Rooms Safety Tips: हॉटेलच्या रूममध्ये कुठे असतात छुपे कॅमेरे? बुकिंग करण्यापूर्वी तपासा या 4 महत्त्वाच्या जागा

Hair Care: केसांची वाढ झपाट्याने होण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? तुम्हीही करत नाही ना 'या' चुका?

SCROLL FOR NEXT