Nana Patekar saam tv
मनोरंजन बातम्या

Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृत्यू प्रकरणात गोवा पोलिसांकडून गुन्हा दाखल; कारण काय?

Nana Patekar Death News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर गोवा पोलिसांनी BNSS कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Nana Patekar death case Goa police investigation : ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. या वेळी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

नाना पाटेकर यांचे गुरुवारी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या प्रकरणी आता गोवा पोलिसांनी 'अनैसर्गिक मृत्यू' (Unnatural Death) अशी कायदेशीर नोंद करत गुन्हा दाखल केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक (PSI) नितीन नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नाना पाटेकर यांना त्यांच्या डोना पौला येथील निवासस्थानावरून तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तपासाचा एक भाग म्हणून, मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करणार आहेत. तसेच, गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) शवविच्छेदनाची (Post-Mortem) व्यवस्था करून कुटुंबीय व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जातील.

सध्या पोलीस या मृत्यूच्या परिस्थितीचा आणि कारणाचा सखोल तपास करत आहेत. तपासात मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाल्यास हे प्रकरण नियमानुसार बंद केले जाईल. मात्र, तपासादरम्यान काही घातपात किंवा संशयास्पद बाबी समोर आल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अभिनय आणि सामाजिक क्षेत्रातील अनमोल योगदान

नाना पाटेकर यांनी मराठी रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या प्रभावी, आक्रमक आणि वास्तववादी अभिनयाने एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. आपल्या प्रदीर्घ कलाप्रवासात त्यांनी अनेक विविधांगी भूमिका साकारत रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता, त्यांनी 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही, विशेषतः शेतकरी कल्याणासाठी, अत्यंत उल्लेखनीय योगदान दिले.

मानवतेचे काम जागतिक पातळीवर नेणार : मल्हार पाटेकर

अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, शारीरिकदृष्ट्या आपल्या सर्वांनाच एक दिवस जायचे असते, तसे आज नानासाहेब गेले. मात्र, त्यांचे कर्तृत्व आणि कार्य असे आहे की, नानासाहेबांसारखी व्यक्ती कधीही कुठे जात नाही; ती कायम अजरामर राहते. माझ्यासाठी नानासाहेब नेहमीच सोबत आहेत. मानवतेच्या नावाने एकत्र या आणि जगाच्या कल्याणासाठी कार्य करा, हा एकच विचार त्यांच्या डोक्यात असायचा. महाराष्ट्रातून सुरू झालेले हे समाजकार्य आज संपूर्ण देशभरात पोहोचले आहे. हे काम जागतिक पातळीवर विस्तारावे, हे नानांचे स्वप्न होते आणि त्याच दिशेने आता आमची वाटचाल सुरू राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बालाघाटच्या खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं

Accident News : कोल्हापुरात भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू; भरधाव डंपरची ३ दुचाकींना जोरदार धडक

ladki Bahin Yojana : दसरा की दिवाळी? लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

Weather Update : राज्याला उन्हाचा चटका, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज वाचा

Cholesterol : सुका मेवा हृदयासाठी धोकादायक? 'या' ५ सवयींमुळे वाढू शकतो कोलेस्ट्रॉलचा धोका

SCROLL FOR NEXT