Tanushree Dutta Reaction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tanushree Dutta Reaction: नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाली अभिनेत्री?

Tanushree Dutta Reaction: नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा आहे. अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करतआहेत. याचवेळी तनुश्री दत्ताची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Tanushree Dutta Reaction: ८ ऑक्टोबर हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुःखद दिवस आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक कार्यासाठी देखील नाना पाटेकर ओळखले जात होते.

नाना पाटेकर हे अभिनेते नव्हते, तर दिग्दर्शक आणि रंगभूमी कलाकार म्हणूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘नटसम्राट’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्रीसह अनेक सन्मान मिळाले होते. त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन विश्वाला शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. मात्र यामध्ये अभिनेत्री तनुश्री दत्ताची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.

तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने सांगितले की, 'मला ही बातमी समजली आहे. आज माझा कामाचा दिवस आहे. मी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी लखनऊला जात आहे आणि मला त्यावरच लक्ष केंद्रित करायचे आहे. माझ्या संपूर्ण दिवसाचे नियोजन आधीच ठरलेले आहे. मी पोस्ट करणार आहे आणि 'लाईव्ह' सुद्धा येणार आहे. मला माहिती होतं की मिडिया या 'इव्हल डेड'च्या बातमीच्या कव्हरेजमध्ये व्यस्त असतील, म्हणून मला माझी प्रतिक्रिया द्यायची होती. मी सध्या यावर कशी प्रतिक्रिया द्यावी याचा विचार करत आहे. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.'

पहाटे ५:२० वाजता नानांचे निधन झाले

नाना पाटेकर गोव्यातील डोना पॉला येथील राहत होते. गुरुवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे त्यांनी मित्राला कळवले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पहाटे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मृत्यूपत्रात मिळालेली जमीन-मालमत्ता नावावर कशी कराल? सरकार दरबारी काय कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया अन् कागदपत्रे

Best Home Remedy for Jaundice: कावीळ झाल्यावर बेलाच्या पानांचा प्रभावी उपाय करा; काही दिवसांतच दिसेल फरक

Maharashtra News Live Update: इंडिया आघाडीची पुन्हा लंच डिप्लोमसी, राहुल गांधी बैठकीसाठी पोहचले

Pitru Paksha : तुपाचा खमंग स्वाद अन् गुळाची गोडी; पितृपक्षात बनवा गव्हाची लापशी, प्रसादासाठी एकदम सोपी रेसिपी

Election Result: भाजपचा दारूण पराभव, काँग्रेसचा विजय; या निवडणुकीत शेवटच्या क्षणी बाजी पलटली

SCROLL FOR NEXT