Akhil Akkineni Engagement SAAM TV
मनोरंजन बातम्या

Akhil Akkineni Engagement: नागार्जुनच्या धाकट्या मुलाने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे भावी सून? पाहा PHOTOS

Akhil Akkineni Zainab Ravdjee Engagement : नागा चैतन्यचा सावत्र भाऊ अखिल अक्किनेनीही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडला आहे.

Shreya Maskar

साउथ स्टार नागार्जुनच्या (Nagarjuna) घरी सध्या लगीन घाई पाहायला मिळत आहे. नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यात आता नागार्जुनच्या धाकट्या मुलाने देखील गुपचूप साखरपुडा उरकला आहे. नागार्जुनच्या धाकटा मुलगा अभिनेता अखिल अक्किनेनीने (Akhil Akkineni) सोशल मीडिया फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अखिल अक्किनेनी जैनाब रावदजी (Zainab Ravdjee) सोबत साखरपुडा केला आहे. त्याने इंस्टाग्रामावर शेअर केलेल्या फोटोंना खूप हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं आहे की, "तुम्हा सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी आणि जैनाब रावदजीने साखरपुडा झाला आहे. " फोटोंमध्ये दोघांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. सध्या या गोड जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अखिल अक्किनेनीच हा दुसरा साखरपुडा आहे. याआधी त्याने श्रिया भुपलशी साखरपुडा केला होता. हा साखरपुडा 2016 मध्ये झाला. मात्र त्याचे नातं लग्नापर्यंत गेल नाही आणि आधीच तुटले. आता पुन्हा एकदा 8 वर्षांनी अखिलने साखरपुडा केला आहे. त्याने गर्लफ्रेंड जैनाब रावदजीसोबत गुपचूप साखरपुडा करून चाहत्यांना धक्का दिला आहे.

अखिल अक्किनेनीने बालकलाकार म्हणून नागार्जुन यांच्या 'सिसिंदरी' चित्रपटात काम केले आहे. त्याने अमेरिकेत अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' हा चित्रपट खूप हिट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रामकुंडावर ठाकरे सेनेचं आंदोलन

Atal Setu : अटल सेतूवर कार थांबवली अन् थेट समुद्रात उडी मारली; पुण्यातील २८ वर्षीय तरुणाच्या पाऊलाने खळबळ

Gold Rate Today : खुशखबर! सोनं ₹१०००० ने झालं स्वस्त, प्रति तोळा किंमत किती? वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

जिम-डाएटिंगचा खर्च वाचेल! दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्याने पोटाची चरबी मेणासारखी वितळेल

बड्या पोलीस अधिकाऱ्याचे निधन, महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा

SCROLL FOR NEXT