Naga Chaitanya Saam tv
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya: नागा चैतन्यने समंथाचं करियर खराब केलं; अभिनेत्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलं

Naga Chaitanya: नागा चैतन्यने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काही बातम्यांमध्ये आपल्याविषयी खोटे दावे करण्यात आल्याचा आरोप त्याने केला असून, काही बातम्यांमध्ये त्याला समंथाचे करिअर उद्ध्वस्त केले असल्याचे अप्रत्यक्ष आरोप केले आहेत.

Shruti Vilas Kadam

Naga Chaitanya: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नागा चैतन्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अफवा आणि ऑनलाइन माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या बदनामीकारक पोस्टविरोधातील कायदेशीर लढ्यामुळे तो चर्चेत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्या ‘पर्सनॅलिटी राइट्स’ अर्थात व्यक्तिमत्त्व हक्कांशी संबंधित प्रकरणात दिलासा देत अंतरिम संरक्षण मंजूर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागा चैतन्यने डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याच्या नावाचा, फोटोंचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच त्याची एक्स पत्नी सामंथा रुथ प्रभुच्याशी संबंधित अनेक चुकीच्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचेही त्याने नमूद केले आहे.

२०१७ मध्ये विवाहबद्ध झालेल्या नागा चैतन्य आणि समंथा यांनी २०२१ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्यांच्या नात्याबाबत अनेक दावे आणि आरोप करण्यात आले. काही पोस्टमध्ये नागा चैतन्यने समांथाला फसवल्याचे आरोपही करण्यात आले होते. या सर्व पोस्ट आणि चर्चांमुळे त्याची इमेज खराब झाली आहे. म्हणून त्याने कोर्टात धाव घेतली होती.

२९ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान नागा चैतन्यच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, काही ऑनलाइन पोस्टमध्ये अभिनेत्याने समंथाचे करिअर उद्ध्वस्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. ही ट्रोलिंग आणि बदनामी असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

‘Raw Talks with VK’ या कार्यक्रमात नागा चैतन्यने आपल्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, “आम्ही आजही एकमेकांचा आदर करतो. आम्ही दोघेही आयुष्यात पुढे आलोय आणि आमचे आयुष्य जगत आहोत. त्यामुळे पुन्हा पुन्हा स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT