Naga Chaitanya Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Naga Chaitanya Wedding : हळद लागली...!नागा चैतन्य अन् शोभिता धुलिपालाच्या घरी लगीन घाई, पाहा हळदीचे PHOTOS

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Haldi Ceremony : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच त्यांचा हळदी समारंभ पार पडला आहे.

Shreya Maskar

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. दोन वर्षांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला एकमेकांना डेट करत आहेत. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात या दोघांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं. शोभिता आणि नागा चैतन्य आता 4 डिसेंबर 2024 ला लग्नबंधनात अडकणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा लग्न सोहळा हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पार पडणार आहे. यांचा लग्नसोहळा तेलुगू पद्धतीने पार पडणार आहे. या जोडप्याच्या घरी सध्या लगीन घाई पाहायला मिळत आहे. नुकताच यांचा हळदी समारंभ (Haldi Ceremony ) पार पडला आहे. यांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हळदी समारंभासाठी यांनी पारंपारिक लूक केला होता. दोघ ही या लूकमध्ये खूपच छान दिसत होते. शोभिताने सुरुवातीला लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. तर हळदी लावण्याच्या वेळी तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. दोन्ही लूकमध्ये शोभिता खूपच सुंदर दिसत होती. हळदीसाठी नागा चैतन्यने क्रीम रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे. त्याने या आधी समांथा रुथ प्रभूशी लग्न केले होते. मात्र 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अलिकडेच नागा चैतन्यचा सावत्र भाऊ अखिल अक्किनेनीचा साखरपुडा पार पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT