Surbhi Jyoti  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Surbhi Jyoti : 'नागिन' फेम अभिनेत्री नॅशनल पार्कमध्ये अडकणार लग्नबंधनात, प्यारवाली लव्ह स्टोरी काय?

Surbhi Jyoti Wedding : टिव्ही स्टार सुरभी ज्योती आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या प्री-वेडिंग शूटचे खास फोटो पाहा.

Shreya Maskar

'नागिन' फेम अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) लवकरच लग्नबंधनात (Wedding ) अडकणार आहे. सुरभी तिचा बॉयफ्रेंड सुमित सूरीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. सुरभी आणि सुमितचे (Sumit Suri) लग्न आज (27 ऑक्टोबर) रोजी पार पडणार आहे.

सुरभी ज्योती आपल्या सोशल मीडियावर प्री-वेडिंगचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सुरभी आणि सुमित खूप सुंदर दिसत आहेत. प्री-वेडिंगसाठी त्यांनी पारंपरिक पोशाख निवडला आहे. हे कपल पिवळ्या रंगामध्ये रंगून गेले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात यांनी आपले प्री-वेडिंग पार पाडले आहे. त्यांनी जंगलात दिवे लावताना छान फोटोशूट केले आहे. सुरभीने या पोस्टला खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं आहे की, "सुमित आणि मी आमच्या नवीन नात्याची सुरुवात निसर्गाच्या पवित्र सान्निध्यात करत आहोत." सुरभीच्या लग्नाची बातमी ऐकताच चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सुरभी ज्योती आणि सुमितच्या लग्नाआधीच्या विधी सुरू झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सुरभी आणि सुमितने लग्नासाठी निसर्गरम्य ठिकाण निवडले आहे. या जोडप्यांने उत्तराखंडाची निवड केली आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. हे मोठे आलिशान रिसॉर्ट आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने ती दोघे लग्न करणार आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्वांचा आदर करीत ते हे लग्न करणार आहेत. चाहते त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक दिसत आहेत.

'हांजी - द मॅरेज मंत्रा' या म्युझिक व्हिडीओसाठी सुरभी आणि सुमित पहिल्यांदा भेटले. हे दोघेपण मनोरंजन सृष्टीत काम करत आहेत. सुरभी अनेक हिट मालिका केल्या आहेत. तिची 'नागिन' आणि 'कुबूल है' हे शो खूप गाजले आहेत. व्हिडीओत ते वधू-वराच्या रुपात दिसले. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. अनेक वर्ष एकमेकांना डेट करून ते आता लग्नबंधनात अडकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT