naagin 7  SAAM TV
मनोरंजन बातम्या

सलमान खानच्या 'Bigg Boss 19'मध्ये दिसणार 'नागिन'ची पहिली झलक, 'ही' अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

Naagin 7 Actress : 'नागिन ७' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'नागिन'मधील मुख्य अभिनेत्रीचा चेहरा सलमान खानच्या 'बिग बॉस 19'मध्ये पाहायला मिळणार आहे.

Shreya Maskar

'नागिन ७' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'नागिन ७'मधील मुख्य अभिनेत्रीची झलक 'बिग बॉस 19'मध्ये पाहायला मिळणार आहे.

'बिग बॉस 19'चा वीकेंड का वार खूपच गाजणार आहे.

'नागिन 7' घोषणे पासून मालिकेत मुख्य भूमिकेत कोण झळकणार, याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. 'नागिन 7' टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'नागिन 7'चे ग्राफिक व्हिज्युअल्स लय भारी आहेत. 'नागिन 7'ची निर्माती एकता कपूर आहे. 'नागिन 7' नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. नुकताच 'नागिन ७'चा (Naagin 7) नवीन प्रोमो समोर आला आहे.

प्रोमोमध्ये एक महिला नागिन रुपातून मानवाच्या रुपात येताना दिसत आहे. ती एका पडद्यामागे लपलेली आहे. आता पडद्यामागे नेमकं कोण? याची चर्चा सोशल मीडियावर चांगली रंगली आहे. 'नागिन ७'ची मुख्य अभिनेत्री पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र अखेर 'नागिन'ची झलक लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

प्रोमोच्या व्हिडीओला एक खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "खतम होने वाला है इंतजार, नागिन की पहली झलक देखना हो जाइये तैयार" या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. 'नागिन ७'च्या मुख्य अभिनेत्रीची पहिली झलक 'बिग बॉस 19' च्या 'वीकेंड का वार' मध्ये पाहायला मिळणार आहे. हा भाग 2 नोव्हेंबरला रात्री 10.30 वाजता कलर्स टिव्ही आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

'नागिन 7' मुख्य अभिनेत्री कोण?

मीडिया रिपोर्टनुसार, 'नागिन 7'मध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी आणि ईशा मालवीय दिसणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप अभिनेत्रीच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नाही. प्रियंका चाहर चौधरी आणि ईशा मालवीय दोघीही बिग बॉस शोमध्ये झळकल्या आहेत. 'उडारियां'मधून प्रियंका चाहर चौधरीला खूप लोकप्रियता मिळाली. तर ईशा मालवीय अनेक शोमध्ये दिसते. तसेच तिचे म्युझिक अल्बमही खूप गाजतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT