Marathi Actor saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actor : नवीन वर्षात मराठी अभिनेत्याला लॉटरी, आलिशान घरासोबत खरेदी केली कार; पाहा VIDEO

Marathi Actor Buy New Home-Car : मराठमोळ्या अभिनेत्याने नवीन वर्षात आलिशान घर आणि लग्जरी कार खरेदी केली आहे. व्हिडीओ शेअर करून त्याने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

नवीन वर्षात मराठी अभिनेत्याने लग्जरी कार खरेदी केली आहे.

तसेच अभिनेता आपल्या नवीन घरात गेला आहे.

लोकप्रिय अभिनेता सध्या 'मुरांबा' मालिकेत काम करत आहे.

मराठी अभिनेत्याने चाहत्यांना एक नाही तर तब्बल दोन गुडन्यूज दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या सुरूवातील अभिनेता अभिजीत चव्हाणने आलिशान घर आणि लग्जरी कार खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. सध्या अभिजीत चव्हाण हा 'मुरांबा' मालिकेत दिसत आहे. आजवर अभिजीतने अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे.

अभिजीत चव्हाणने सोशल मीडियावर कार खरेदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्याने लाल रंगाची गाडी खरेदी केली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेता त्याच्या कुटुंबासोबत कार घेण्यासाठी गेला होता. नवीन कारची त्यांने पूजा केली. त्यानंतर फोटो काढले आणि नवीन कार मधून फिरायला गेला. त्याच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी त्याला शुभेच्छा देताना आणि कौतुक करताना दिसत आहेत.

अभिनेत्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "गेले वर्ष इतके वाईट गेले... मी स्वतःचं नवीन घर आणि नवीन गाडी घेऊन लाड केलं....गणपती बाप्पा मोरया !" अभिजीत चव्हाणने महिंद्राची कार खरेदी केली आहे. अभिजीत चव्हाण हे मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. आजवर त्याने आपल्या भन्नाट विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवले आहे.

अभिजीत चव्हाण सध्या त्याच्या 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकामुळे चांगला चर्चेत आहे. 'मुरांबा' मालिकेत अभिजीत चव्हाण यांच्या भूमिकेचे नाव शशिकांत मुकादम असे आहे. आजवर अभिजीत चव्हाणने अनेक खलनायकाची पात्र साकारली आहेत. 'मुरांबा' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार दुपारी 1.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

Fried Modak Recipe: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायासाठी बनवा खुसखुशीत स्वादिष्ट तळणीचे मोदक; वाचा सोपी रेसिपी

Mysterious Fort : सोनं-चांदीने भरलेल्या विहिरी! 'या' किल्ल्यातील गुप्त खजिन्याचं रहस्य आजही कायम

SCROLL FOR NEXT