Munawar Faruqui Gets Angry On Restaurant Owner For Throwing Eggs On Him At Iftaar Party Saam Tv
मनोरंजन बातम्या

Munawar Faruqui Video: बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीवर हल्ला, लोकांकडून अंडी फेक, Video Viral

People Attacked on Munawar Faruqui Throwing Egg: प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन आणि 'बिग बॉस १७' चा विजेता मुनव्वर फारुकी नेहमी काही न काही कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच मुनावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुनव्वर फारुकीच्या अंगावर अंडी फेकली असल्याचे दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Munawar Faruqui Viral Video Of Iftaar Party:

प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन आणि 'बिग बॉस १७' चा विजेता मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) नेहमी काही न काही कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच मुनावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुनव्वर फारुकीच्या अंगावर अंडी फेकली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुनावर खूप जास्त रागावलेला दिसत आहे.

८ एप्रिलला मध्यरात्री मुनव्वरवर एका रेस्टॉरंटच्या मालकाने अंडी फेकून मारली. त्यामुळेच मुनव्वरला राग आला होता. रेस्टॉरंटचा मालक आणि त्याच्यासोबतच्या पाच कर्मचाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Entertainment News)

एका रिपोर्टनुसार, मुनव्वर फारुकीला इफ्तारीसाठी मिनारा मशीद परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये आमंत्रित केले होते. पण तो तिथे न जाता दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेला. त्यामुळे त्याच्या अंगावर अंडी फेकली असल्याचे सांगितले जात आहे.

मुनव्वर फारुकीचा रेस्टॉरंट परिसरातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मुनव्वर रेस्टॉरंटच्या मालकावर प्रचंड संतापलेला दिसत आहे. मुनव्वरला त्याचे सुरक्षा रक्षक गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्व गोष्टींमुळे मुनव्वरच चांगलाच संतापला होता. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रेस्टॉरंट मालक आणि पाच कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: संसारात ढवळाढवळ, जावयाची सटकली; सासूला कायमचं संपवलं, शरीराचे १९ तुकडे करून...

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

SCROLL FOR NEXT