Celebrity Bomb Threat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Celebrity Bomb Threat: अमिताभ बच्चन यांचे घर आणि दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबईत धमकीच्या ई-मेलने खळबळ

Celebrity Death Threat: मुंबईच्या महापौर कार्यालयासह अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमांचा उल्लेख असलेल्या धमकीच्या ई-मेलमुळे खळबळ उडाली आहे. दादरमधील काही शाळांनाही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Shruti Vilas Kadam

Celebrity Death Threat: मुंबईत धमकीच्या ई-मेलमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर कार्यालयासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टचा उल्लेख या ई-मेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला टार्गेट करण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, मुंबईतील काही शाळांनाही धमकीचे ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे शहरातील सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

दिलजीत दोसांझ आणि अमिताभ बच्चन

दिलजीत दोसांझच्या भारत दौऱ्याची सध्या चर्चा सुरू आहे. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे २७ नोव्हेंबर रोजी त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, या कॉन्सर्टचा उल्लेख धमकीच्या ई-मेलमध्ये असल्याने आयोजक आणि चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच, अमिताभ बच्चन यांचा बंगला जलसावर 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान हल्ला करु अशी धमकी दिली आहे. या धमकीमागे नेमके कोण आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

दादरमधील शाळांनाही धमकीचे ई-मेल

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादर परिसरातील तीन ते चार शाळांना सकाळच्या सुमारास धमकीवजा ई-मेल प्राप्त झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित शाळांच्या परिसराची तपासणी केली. प्राथमिक तपासादरम्यान संशयास्पद वस्तू आढळून आल्या नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, धमकीच्या ई-मेलमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ही धमकी समोर आल्याने मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान आणि आमिर खान यांसारख्या कलाकारांना टार्गेट करण्याचा हल्लेखोरांचा विचार होता आणि त्यानंतर टायगर श्रॉफवर पाळत ठेवण्यात आल्याचा दावाही समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: आंदोलन मागे घेण्यासाठी ५०० कोटींची ऑफर आली होती का? मनोज जरांगेंनी सांगितले सत्य

Maharashtra News Live Update: महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा विश्वास

Camphor Bath Benefits: कापूरच्या पाण्याने आंघोळ करण्याचे 5 जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Pune Accident : भीषण अपघात! मतदान केंद्रावर बूथ प्रतिनिधीला घेऊन जाणारी कार विद्यार्थ्यांना धडकली; एका मुलीचा मृत्यू

Cleaning Tips : दारा-खिडक्यांच्या लोखंडी जाळीवरील घाण आणि चिकटपणा मिनिटांत साफ करण्याची सोपी ट्रिक, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT