Siddharth Khirid SAAM TV
मनोरंजन बातम्या

Siddharth Khirid : 'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली अन् केली नवीन आयुष्याची सुरूवात, कोण आहे होणारी बायको?

Siddharth Khirid Relationship Update: 'मुलगी झाली हो' फेम अभिनेता सिद्धार्थ खिरीड यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्याची होणारी बायको कोण जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई पाहायला मिळत आहे. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर काहींनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्याचे नाव जोडले गेले आहे. 'मुलगी झाली हो' फेम अभिनेता सिद्धार्थ खिरीड (Siddharth Khirid) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

मराठी अभिनेता सिद्धार्थ खिरीडने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. नुकताच सिद्धार्थ सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो रोमँटिक अंदाजात गर्लफ्रेंडसोबत पोज् करताना पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये गर्लफ्रेंडचा चेहरा दिसत नाही आहे. मात्र बॅकग्राऊंडला गुलाबांनी सजवलेला हॉर्ट पाहायला मिळत आहे.

सिद्धार्थने पोस्टला खूप हटके कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिलं की, "फक्त 2024 संपत नाही तर माझ्या आयुष्यातील 'सिंगल' अध्यायही संपतो आहे." त्याच्या या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता कलाकारांकडून आणि चाहत्यांकडून सिद्धार्थवर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या या सुखद धक्याने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

सिद्धार्थने पोस्टमध्ये गर्लफ्रेंडचा खुलासा केला नाही आहे. सिद्धार्थची जोडीदार कोण हे जाणून घेण्यास आता चाहते उत्सुक आहेत. सिद्धार्थने 'मुलगी झाली हो' मालिकेसोबतच फ्रेशर्स, जाऊबाई जोरात, हृदयी प्रीत जागते अशा अनेक लोकप्रिय मालिका केल्या आहेत. सिद्धार्थ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT