michele morrone and jacqueline Instagram/@jacquelinef143
मनोरंजन बातम्या

Mud Mud Ke Song Out: '365 डेज' स्टार मिकेल मॉरोन आणि जॅकलीन फर्नांडिस यांची केमिस्ट्री

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे ३६५ डेज (365 Days) फेम अभिनेता मिकेल मोरोनसोबतचे (michele morrone) काही फोटो व्हायरल झाले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे ३६५ डेज (365 Days) फेम अभिनेता मिकेल मोरोनसोबतचे (michele morrone) काही फोटो व्हायरल झाले होते. हे दोघे गाण्याच्या व्हिडिओमध्ये एकत्र येणार असल्याची चर्चा होती. या फोटोबद्दल तेव्हा चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली. या गाण्याचा टीझर प्रचंड हिट झाला होता. आता 'मुड मुड के' हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात जॅकलिन आणि मोरनची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. मोरॉन त्याच्या रोमँटिक अवतारासाठी जगभरात ओळखला जातो. आता या गाण्यामधुन तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

मिकेल खूप लोकप्रिय अभिनेता आहे. '365 डेज' या चित्रपटातून त्याला जगभरात ओळख मिळाली. या चिंत्रपटामुळे भारतातही त्याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आता या गाण्याने मायकलच्या बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली आहे.

या गाण्यात जॅकलीनसोबतची त्याची जबरदस्त लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळत आहे, दोघांमधील जबरदस्त इंटिमेट सीन्सही आहेत. मोरॉन आणि जॅकलीन या दोघीही त्यांच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखले जातात.

Mikel Morrone ची जगभरात प्रचंड क्रेझ;

मोरॉन त्याच्या '365 डेज' चित्रपटाने अचानक खळबळ माजवला होता. मुलींमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे. तो एक इटालियन अभिनेता आहे परंतु त्याच्या उत्कृष्ट रोमँटिक अभिनय कौशल्यासाठी तो जगभरात ओळखला जातो. त्याचबरोबर जॅकलीन भारत आणि श्रीलंकेसह अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. या गाण्याने दोघांनीही खळबळ माजवली आहे. हे गाणे रिलीज झाल्यापासून खूप वेगाने व्हायरल होत आहे. देसी म्युझिक फॅक्टरीच्या यूट्यूब चॅनलवर हे रिलीज करण्यात आले आहे. याला टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी आवाज दिला आहे.

Mud Mud Ke Song-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सामुहिक योगासनांचा सराव

Vat Purnima 2026 : ना मैदा, ना गहू; यंदा वटपौर्णिमेला बनवा फणसाची पुरी, एक घास खाताच नवरोबा खुश

Diabetes control: आहारातील हे ३ बदल करतील मधुमेहाचा धोका कमी

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT